Amalner

Amalner: जैतपिर येथील अल्पवयीन मुलीला नेले पळवून..

Amalner: जैतपिर येथील अल्पवयीन मुलीला नेले पळवून..

अमळनेर येथील जैतपिर या गावातून अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशमधील एकाने पळवून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जैतपिर येथून १७ वर्षीय मुलीला फुस लावून अजय कतला रा. भोपाल, म प्र. नामक इसमाने पळवून नेले.त्यानंतर त्याने मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, तुमची मुलगी माझ्यासोबत आहे पोलिसात तक्रार केली तर तिला मारून टाकू अशी धमकी दिली. यामुळे संबंधित मुलीचे वडील घाबरून गेले व त्यांनी तक्रार केली नाही. ही घटना 31 डिसेंबर 2021 रोजी घडली होती. पण आता मुलगी परत येण्याचे चिन्ह दिसेना म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात भादवि कलम ३६३, ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो. उ. नि. वैभव पेठकर करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button