Pandharpur

स्वेरीच्या डी. फार्मसीमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

स्वेरीच्या डी. फार्मसीमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूरः गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डी.फार्मसी महाविद्यालयामध्ये ‘माजी विद्यार्थी मेळावा ‘२०२१-२२’ हा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून म्हैसूरमधील वरिष्ठ अभियंता सागर अमृतम हे उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली व स्वेरीच्या डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली हा ‘माजी विद्यार्थी मेळावा’ ऑनलाइन घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ऑनलाइन झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. डिप्लोमा फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करून स्वेरी फार्मसीच्या जडण घडणीत माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले. स्वेरीच्या २०१६ बॅचपासून चे अनेक विद्यार्थी जे आज फार्मासिस्ट व फार्मसी संबंधी असलेल्या इतर कंपन्यात, उद्योगव्यवसायात मोठमोठया पदावर कार्यरत आहेत ते या मेळाव्यात सहभागी झाले होते. प्रा. मुबिना मुजावर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सागर अमृतम यांनी ‘निर्जंतुकीकरण उत्पादनाची व्हिज्युअल तपासणी’ यावर प्रामुख्याने प्रकाश टाकून स्वेरीत घेतलेल्या शिक्षणाचा आपण भविष्यात फायदा करून घ्या. स्वेरीने करिअरचा पाया रचला असला तरी आपल्यालाच त्याचा कळस चढवायचा आहे. हे ध्यानात ठेवून आली वाटचाल असावी.’ असे प्रतिपादन केले. प्राचार्य प्रा. मांडवे म्हणाले की, ‘कोविडच्या या कठीण काळातही स्वेरीने आपले शैक्षणिक उपक्रम अतिशय परिणामकारकपणे राबवले. कोविड महामारीला एक संकट न मानता त्याला एक संधी समजून विविध विषयांचे अध्यापन, टेस्टस, काही विषयांचे प्रात्यक्षिक, गेस्ट लेक्चर्स आदी उपक्रम स्वेरीने यशस्वीपणे राबवले आणि अजूनही राबवले जात आहेत. यावेळी फार्मसी उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी रोहीत माळी, अंजली उन्हाळे, मनीषा जरे, शिवानी खर्डे, हर्षदा पवार, विशाल कदम आणि श्रीदेवी राठोड यांनी आपले मनोगत मांडले. ‘स्वेरीतील शिस्तीचा, शैक्षणिक संस्कृतीचा व प्राध्यापकांनी आमच्यावर केलेल्या संस्कारांचा आम्हाला खूप फायदा होत आहे. त्यामुळे डॉ.रोंगे सरांना व सर्व प्राध्यापकांना आम्ही मनापासून वंदन करतो.’ असे मनोगत सर्व माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी हेंबाडे यांनी केले तर प्रा.नितल दांडगे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button