Amalner

अमळनेर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्यांना ५% निधी वाटप..

अमळनेर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्यांना ५% निधी वाटप..

अमळनेर येथील नगरपरिषदेत शासन परिपत्रक, नगर विकास विभाग, क्र. संकीर्ण-२०१०/प्र.क्र.१४६/२०१०, दिनांक ३०.१०.२०१० अन्वये अपंग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा, १९९५ च्या कलम ४० अन्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानी अपंगांसाठी ५% राखीव निधी देणेबाबत तरतूद आहे. शासन आदेशानुसार अमळनेर नगरपरिषद हद्दीतील कुटुंबात एकापेक्षा जास्त अपंग व्यक्ती असल्यास त्यांना त्यांच्या उत्पन्न व टक्केवारी नुसार प्राधान्य देणेबाबत सूचित केले आहे. अमळनेर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील UDID (कायमस्वरूपी) कार्ड असलेले पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे एकूण २२० अर्ज नगरपालिकेस प्राप्त झाले होते.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये दिव्यांग कल्याण ५% निधीसाठी रुपये १०,२७,५७८/- इतकी तरतूद करण्यात आली होती. सदर रकमेतून शहरातील २२० पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना सरासरी रुपये ४,७५०/- प्रमाणे रुपये १०,२५,०००/- अमळनेर नगर परिषदेने माजी आमदार कृषिभूषण श्री साहेबराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी श्री.प्रशांत सरोदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button