Latur

न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सिलिंग जमीन वाटप करा कामखेडेच्या भूमिहीन यांच्या उपोषणाला भिमआर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे सह लातुर जिल्हा प्रमुख व अन्य पदाधिकारी यांनी दिली भेट

न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सिलिंग जमीन वाटप करा कामखेडेच्या भूमिहीन यांच्या उपोषणाला भिमआर्मी चे
महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे सह लातुर जिल्हा प्रमुख व अन्य पदाधिकारी यांनी दिली भेट

लक्ष्मण कांबळे लातूर

लातूर : औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणे कामखेडा येथील 346 एकर जमिनीचे वाटप करावे या अन्य मागण्यांसाठी सोमवार, दि.28 जुन 2021 रोजी पासून कामखेड्यातील भुमिहिन लाभार्थी उपोषणास बसले आहेत. कामखेडा ता रेणापूर येथील 346 एकर सिलिंग जमीनचे वाटप करण्या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दि 5 डिसेंबर 2018 रोजी निर्णय दिला असून त्या आदेशानुसार येथील रहिवासी व भूमिहीनांना या सीलिंग जमिनीचे वाटप करावे व कामखेडा गावातील गायरानावर ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण हटविण्यात यावे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी गेली चार दिवसा पासून निराधार महिला व पुरुष, उपोषणास बसले आहे प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. भीम आर्मी संघटनेचे युवा नेते अक्षय धावारे यांनी उपोषण ठिकाणी तात्काळ धाव घेत उपोषणकर्त्यांची सांत्वन केले तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून उपोषणकर्त्यांची व्यथा स्थानिक प्रशासन, अधिकारी सामान्य जनता याच्यापर्यंत पोहोचली व या प्रकरणाचे तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशारा ईथल्या स्थानीक प्रशासनाला देण्यात आला या प्रकरणाची तात्काळ दखल घेत लातूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांनी उपोषण कर्त्यांचे उपोषण ठिकाणी जाऊन तात्काळ प्रकरण निकाली काढले जाईल असे आश्वासन दिले. तसेच सिलिंग जमीन बचाव कृती समितीच्या वतीने भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे आणि भीम आर्मी संघटनेचे मनपूर्वक आभार सिलींग जमीन बचाव कृती समिति च्या वतीने हे उपोषण करण्यात आले होते उपोषण प्रमुख उत्तम खंडागळे, समाधान येदे, व इतर दत्तू खंडागळे, गोपीनाथ खंडागळे गणपत खंडागळे, विष्णू कदम गंगाधर खंडागळे नितीन खंडागळे, केरबा कदम शांताबाई शिंदे, लोचना बाई, शिवाजी सूर्यवंशी, राजाभाऊ कदम मदन सूर्यवंशी, बालिका जोगदंड व अन्य उपोषणकर्ते व भिम आर्मीचे पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button