Shindkheda

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक..

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक..

शिंदखेडा असद खाटीक

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्याबाबत तालुका काँग्रेस कमिटी यांना कळविले आहे या पार्श्वभूमीवर आज शिंदखेडा तालुका काँग्रेसचे बैठक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी तालुक्यातील ट्रॅक्टर रैलीस खा‌.राहुलजी गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील साहेब,अहमद पटेल जी ,मुकुल वासनिक साहेब, सचिन पायलट साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, खासदार राजीव सातव, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार अमित भैय्यासाहेब देशमुख साहेब व आमदार कुणाल बाबा पाटील आदी नेत्यांना आमंत्रित करण्यात यावे असा ठराव पारित करण्यात आला असा ठराव पारित करण्यात आला.

सदर बैठकीत शिंदखेडा तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती व संततधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना राज्य सरकारच्या पॅकेजमधून आर्थिक भरपाई मिळावी तसेच सोनवद प्रकल्प वाडी शेवाडी प्रकल्प अमरावती धरणाचा डावा व उजवा कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे याबाबत ठराव उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी हात उंच करून सर्व ठरावांना अनुमोदन दिले . यावेळी शिंदखेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब पवार विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, पांडुरंग माळी, विकास पवार, डॉ.जे.पी.बोरसे,डॉ.प्रशांत बागुल, नगरसेवक दिपक अहिरे उदय देसले, चंद्रकांत सोनवणे,प्रा. विशाल पवार,प्रकाश पाटील, नरेंद्र पाटील,,पुरुषोत्तम पाटील, शामकांत पाटील,प्रमोद बोरसे,शानाभाऊ पाटील, सचिन सोनवणे,आबा मुंडे, महेंद्र पाटील, पंजाबराव सोनवणे,उमेश पवार,राकेश गिरासे, चंद्रकांत शिरसाठ,आशिष बागुल, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कुलदीप निकम, राकेश राजपुत,देवेंद्र ठाकरे,दिपक पाटील,खंडु भदाणे,लोटन पाटील, धनराज देसले, विजेंद्र झालके, धनंजय पाटील,ज्ञानेश्वर पाटील, उमेश पवार, गोकुळ पवार,आयुबखा पठाण, नंदकिशोर पाटील, अरुण पाटील, पंकज पाटील, कैलास परदेशी, राजेंद्र परदेशी, विजय पाटील,पावबा कोळी, मुकेश पाटील, राहुल माणिक,भारत जाधव,हर्षल पाटील,मयुर पाटील, निखिल पाटील, महेंद्र महाजन, अशोक महाजन,स्वप्निल गोसावी, भागवत परदेशी, महेंद्र भदाणे, साहेबराव पाटील, वकील ठाकरे,पप्पु सुतार, माणिक नगराळे,सागर नगराळे, संदीप वाघ, योगेश बागुल, प्रशांत बेहेरे, कल्लुदादा पठाण यांच्या सह शेतकरी व कार्यकर्ते शेकडो च्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button