Pandharpur

शेतीपंपाचे व घरगुती वापराचे संपू्र्ण वीज बील माफ करावे,,,दिलीपबापू धोत्रे

शेतीपंपाचे व घरगुती वापराचे संपू्र्ण वीज बील माफ करावे,,,दिलीपबापू धोत्रे

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर दुष्काळ, अतिवृष्टी,महापूर आणि सध्या सुरु असलेल्या
कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहेत. त्यातच फळांचे व इतर शेतीमालाचे भाव गडगडले आहेत. अशावेळी राज्य सरकारने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपाचे आणि घरगुती वापराचे संपूर्ण वीज बील माफ करावे, राज्य सरकारने अधिवेशनामध्ये वीज बिल माफीची घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शॅडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांनी केली आहे. सिध्देवाडी (ता.पंढरपूर) येथे मनसे शाखेचे उदघाटन दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी शेतकरी प्रश्ना संबंधी
केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. श्री.धोत्रे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून राज्यातील सर्वसामान्य मजूर वर्ग व शेतकरी कोरोनाच्या
सावटाखाली आपली जीवन जगत आहे. अशा संकट काळात देखील शेतकरी इमाने ईतबारे
कष्ट करीत आहेत. मागील काही वर्षापासून दुष्काळा, महापूर आणि अतिवृष्टी
या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी उध्दवस्थ झाला आहे. त्यातच आता केंद्र
सरकाने नव्याने लागू केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकरी आणि त्यांचा शेती
व्यवसाय मोडला आहे.तर दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे. अशातच शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. केंद्र आणि राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.शेतकर्याच्या मतावर निवडून आलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारलाही आता शेतकर्यांचा विसर पडला आहे. शेतकरी अडचणीत असताना वीज बीलाच्या वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. अनेक शेतकर्यांची वीज तोडली आहे. मनसे शेतकर्यांच्या पूर्ण पाठीशी आहे.शेतकर्यांना केवळ तात्पुरता दिलासा देवून चालणार नाही त्यांच्या शेतीपंपाचे व घरगुती वापराचे संपूर्ण वीज बील माफ करावे, अधिवेशनामध्ये
राज्य सरकारने तशी घोषणा करुन शेतकर्यांना दिलासा द्यावा अन्यथा मनसेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृ्त्वाखाली सरकार विरोधात राज्यभर आंदोलन
केले जाईल असा इशाराही श्री. धोत्रे यांनी दिला.
पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकी संदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून
घेण्यात येतील. कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या
पर्यंत पोचवण्यात येतील. राज ठाकरे जो आदेश देतील तो शिरसावंद्य असेल
असेही दिलीप धोत्रे यांनी विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातील मनसेची भूमिका
स्पष्ट केली.यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,शाखा
अध्यक्ष स्वप्नील जाधव,विक्रम तिकुटे, सज्जन मस्के,नवनाथ कोळी, सागर
गोडसे, अक्षय मोरे,आदिनाथ कोळी, समाधान मस्के,राज जाधव, संग्राम
जाधव,आकाश जाधव,वैभव जाधव,ओंकार गोडसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button