Bollywood

आलिया रणबीर डिसेंबर मध्ये विवाहबद्ध..!लग्नाची जोरदार तयारी सुरू..!

आलिया रणबीर डिसेंबर मध्ये विवाहबद्ध..!लग्नाची जोरदार तयारी सुरू..!

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असताना दोघेही डिसेंबरमध्ये आलिया-रणबीर विवाह करणार आहेत. मात्र याबाबत अद्याप आलिया-रणबीर कडून अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया नसली तरी दोन्ही कुटूंबा कडून मात्र प्रतिक्रिया आल्या आहेत. यात कपूर फॅमिली कडून रणबीरचे काका ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर यांनी या दोघांच्या लग्नाबाबत करत मला माहित नाही आणि मी ही बातमी ऐकली नाही. त्याचं एक ना एक दिवस लग्न होईल, पण मला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे म्हटले आहे.

तर आलियाच्या आई सोनी राजदान ह्यांनी आपण आलिया आणि रणबीरच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे. लग्न कधी होईल हे मला माहीत नाही. मी सुद्धा त्याचीच वाट पाहत आहे असे म्हटले आहे.

कामाबद्दल बोलायचं तर एका मोठ्या सुट्टी नंतर दोघेही कामात व्यस्त आहेत.आलिया डार्लिंग्स, आरआरआर, गंगूबाई काठियावाडी आणि जी ले जरा सारखे चित्रपट करत आहे तर रणबीर ऍनिमल आणि लव रंजनसोबत एक अनटाइटल्ड हे चित्रपट करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button