Faijpur

नाहाटा महाविद्यालयात रासेयो एककातर्फे “विश्व एड्स सप्ताह” निमित्त ‘एड्स जनजागृती’ संपन्न

नाहाटा महाविद्यालयात रासेयो एककातर्फे “विश्व एड्स सप्ताह” निमित्त ‘एड्स जनजागृती’ संपन्न

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका

येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज दिनांक ५ डिसेंबर 2021 रोजी ” विश्व एड्स सप्ताह” निमित्ताने एड्स जनजागृती करण्यात आली.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.ए.डी गोस्वामी हे होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरणगाव ग्रामीण रुग्णालय आय.सी.टी.सी.केंद्र च्या पर्यवेक्षिका मा.सौ. ज्योती गुरव व सौ. भावना प्रजापती यांनी उपस्थिती दिली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. आर. एस. नाडेकर व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ममताबेन पाटील हे देखील उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर.एस.नाडेकर यांनी केले. विश्व एड्स सप्ताह’ निमित्ताने मा. सौ. ज्योती गुरव यांनी स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले व एड्स बद्दल प्रतिज्ञा म्हणून घेतली…
अध्यक्ष मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.डी. गोस्वामी यांनी रासेयो चे महत्व सांगितले. इतरांनाही एड्स बद्दल जागृत रहाण्याचा संदेश दिला.
आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ. ममता बेन पाटील यांनी केले. कुमारी.नेहा पाटील व कुमारी संजना दुधानी यांनी सुंदर असे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला रासेयोचे विविध स्वयंसेवक उपस्थित होते. गायत्री बजाज, वैष्णवी ठाकूर, संजना दुधानी, कल्याणी पराळे ,जयश्री पाटील, आदित्य हिवरे, स्वप्निल डोळसे,विक्रांत रोडे, खुशाल मानकर, आकांशा चांदेकर ,तारकेश्वरी सोनवणे, सागर सोनवणे, हर्षल चव्हाण, गोपाळ रंदाळे, चेतना पाटील, निकिता बोरसे ,अमोल सुरडकर, इत्यादी. यांसारखे विविध विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी. एच. बऱ्हाटे, व डॉ. एन. ई. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button