Nashik

व्ही एन नाईक महाविद्यालयात एड्स जनजागृती

व्ही एन नाईक महाविद्यालयात एड्स जनजागृती

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य म गवहाविद्यालय दिंडोरी येथे विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने एड्स जनजागृतीवर व्यख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ संजय सानप होते.

दिंडोरी आरोग्य विभागाच्या डॉ. सुरेखा पांगरे यांनी “एड्स विषयक जनजागृती” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.एड्स सारख्या भयंकर रोगाचा प्रसार होणे टाळण्यासाठी तरुणांनाही खबरदारी तसेच [प्रबोधनात्मक काम करणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय सानप यांनी एड्स निर्मूलनाच्या विद्यार्थ्यांची भूमिका फार महत्वाची ठरू शकते तसेच गावागावातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या विषयावर प्रबोधन महत्वाचे आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. तसेच महाविद्यलयातील रेड रिबन क्लबच्या उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद दुधाने यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. पंकजा अहिरे तर उपस्थितांचे आभार एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.नाना चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button