Nashik

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी थोरात विद्यालयात तर जाणार येथील महात्मा फुले विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी …

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी थोरात विद्यालयात तर जाणार येथील महात्मा फुले विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी …

सुनील घुमरे नाशिक

नाशिक : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर काॅलेज मोहाडी विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणुन साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .यावेळी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर ,विलास पाटील, सुदाम पाटील, रंगनाथ घोलप, जी एम गायकवाड, प्राचार्य विजय म्हस्के, पर्यवेक्षिका निर्मला शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विजय म्हस्के यांनी केले .सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली .अंत्यत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी स्त्री शिक्षणाचे महत्वाचे काम त्यांनी केले .त्यामुळे आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरूषाच्या बरोबरीने काम करीत आहे असे सांगितले .
उपशिक्षक प्रमोद सोनवणे व पर्यवेक्षिका निर्मला शिंदे यांनी ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला .समाजामध्ये स्त्री-पुरूष समानता आणण्याचे मोठे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले.आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगितले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य आपण सर्वांनी पुढे चालवले पाहिजे हीच त्यांना श्रद्धांजलि ठरेल .प्रतिकुल परिस्थितीचा त्यांनी आपल्या जीवनात सामना केला .समाजातील काही लोकांनी त्यांना भरपुर त्रास दिला परंतु न डगमगता त्यांनी आपले स्त्री शिक्षणाचे काम चालु ठेवले .त्यामुळे आज सर्व क्षेत्रात स्त्रीया आपल्याला प्रगती करतांना दिसतात याचे सर्व श्रेय महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते .त्यांचे कार्य अधिक जोमाने आपण चालवुया असे सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते महिला शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला .

तसेच जानोरी येथेही महात्मा फुले विद्यालयात स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष शंकरराव काठे पोलीस पाटील सुरेश घुमरे उपसरपंच गणेश तिडके शंकरराव वाघ विष्णुपंत काटे बाळासाहेब विधाते योगेश तिडके समाधान पाटील आदींसह मुख्याध्यापक हाडससर सर्व शिक्षक सेवक शिक्षिका उपस्थित होते

मोहाडी येथील मोहाडी येथील कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शरद निकम यांनी केले व आभार प्रदर्शन रामनाथ गडाख यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button