Latur

कृषी उत्पन्न बाजार समिती औसा येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू

कृषी उत्पन्न बाजार समिती औसा येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू
लक्ष्मण कांबळे लातूर
औसा : कोणाचीही उपासमार होऊ नये. महाराष्ट्रातला कोणीही माणूस उपाशी झोपू नये. याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी केंद्राची योजना सुरू करण्याचा निर्णय केला. या योजनेतून औसा येथील माळी भोजनगृहाचे मालक रमाकांत बाबुराव माळी यांना औसा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शिवभोजन थाळी केंद्र मंजूर झाले.
दिनांक ४ मे २०२१ रोजी औसा तालुक्याचे सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे यांच्या शुभहस्ते या शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक राजेंद्र भोसले, उपमुख्य प्रशासक किशोर जाधव, औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी, लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे, लोकाधिकारचे जिल्हाप्रमुख विरनाथ अंबुलगे यांची विशेष उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते शिवभोजन थाळी चे वाटप करण्यात आले.
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हे शिवभोजन थाळी केंद्र सुरू झाल्यामुळे आडती वर येणारे शेतकरी, मार्केट यार्डातील हमाल, मजूर यांनी शिवभोजन थाळी केंद्र सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व लाभही घेतला. आज या शिवभोजन थाळी केंद्रास मार्केट कमिटीचे सचिव मुश्ताख शेख, प्रशासकीय संचालक योगीराज पाटील, दत्तात्रय कोळपे, मनोज सोमवंशी, नामदेव माने, निलेश आजने, प्रवीण कोव्हाळे, दिलीप लवटे, संगमेश्वर उटगे, वल्लीखाँ पठाण, पंचायत समिती सदस्य सदाशिव काळे, पत्रकार वामन पाठक, संतोष हुच्चे, ए. व्हि. शेख, भुजंग सोमवंशी, संतोष पनाळे, लिंबराज कुंभार, बस्व धाराशिवे आदींनी माळी भोजनगृह शिवभोजन थाळी केंद्रास भेट देऊन केंद्राचे संचालक रमाकांत बाबुराव माळी यांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button