Maharashtra

नॅशनल सोशालिस्ट पार्टी युवक प्रदेश अध्यक्ष तुकारामभैय्या खांडेकर यांचेकडून प्रसारमाध्यमे व केंद्रसरकारचे अभिनंदन

कोल्हापूरः आनिल पाटील

एन एस पी चे युवक प्रदेश अध्यक्ष तुकारामभैय्या खांडेकर यांनी मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे यांच्या राज्यसरकारकडे आरोग्य सुविधा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुरळीत करावी ग्रामीण आरोग्य सुविधा सध्या बंद आहेत त्या चालू कराव्या, शहरी व ग्रामीण जनतेचे कर्जाचे हप्त्यासाठी मुदत वाढवून मिळावी, जीवनावश्यक वस्तूंचा रेशनवर पुरवठा व्हावा यासाठी मागणी केली होती

तसेच केंद्र सरकार कडे
कोरणाव्हायरसमुळे पुढील २१ दिवस कोणीही बाहेर पडू नये असा आदेश काढल्यामुळे सामान्य माणूस भूकबळीला बळी पडू शकतो त्यासाठी प्रशासनाच्यावतीने जीवनाश्यक गोष्टीचे वाटप करावे व योग्य आर्थिक साहाय्य करावे या दोन मागण्या केंद्रसरकारला केल्या होत्या त्याची दखल घेवून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,श्रीमती निर्मला सीतारामण केंद्रीय अर्थमंत्री यांच्या केंद्रसरकारने पुढील ३ महीन्यासाठी सर्व कर्ज हप्ते बंद करणेस रिझवर्ह बॅक द्वारे देशातील सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. तसेच सामान्य जनतेचे पोट पाणी रोज मिळणाऱ्या रोजदांरीवर अवंलबून आहे. याची दखल घेवून तीन महिने त्यांना मोफत धान्य देणेचा निर्णय शासनाने घेतला आहे जेणेकरून लॉकडाउन च्या काळात आदिवासी,शेतकरी, कंत्राटी कामगार,रिक्षा ड्राइवर,महिला कामगार तसेच सामान्य माणूस भूकबळीला बळी पडणार नाही.
सदर केंद्रसरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य माणसाला थोडासा दिलासा मिळाला आहे.या निर्णयामुळे युवा प्रदेश अध्यक्ष तुकारामभैय्या खांडेकर यांनी देशातील सर्व प्रसारमाध्यमे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नॅशनल सोशालिस्ट पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा मनोज काळसेकर, यांचे मन:पूर्वक सर्व देशवासीयाकडून अभिनंदन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button