Bollywood

बाई,बुब्ज आणि ब्रा नंतर हेमांगी पुन्हा चर्चेत..!सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव..!

बाई,बुब्ज आणि ब्रा नंतर हेमांगी पुन्हा चर्चेत..!सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव..!

मुंबई हेमांगी कवी ही तिच्या अभिनया बरोबरच तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते.विविध व्हिडीओ फोटो शेअर करत असते.तिच्या काही फोटों ना लोक पसंत करतात तर काही वर टीकेची झोड उठवली जाते.काही दिवसांपूर्वी हेमांगीने सोशल मीडियावर लिहिलेली ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही पोस्ट चांगचील व्हायरल झाली होती. ती पोस्ट काही व्यक्तींना खटकली होती. तर काही व्यक्तींनी हेमांगीचे कौतुक केले होते. स्त्रियांनी ब्रा घालावी का? यासंदर्भातली ती पोस्ट होती.

त्यानंतर हेमांगी आता पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आहे.
दसऱ्याला नेसलेल्या साडीवरील फोटो शेअर करत तिने आंनद व्यक्त केला आहे. ह्या फोटोचे अनेकांनी कौतुक केले आहे तर काहींनी टीका केली आहे.एका महिलेने च कमेंट्स करत लिहित आहेत “खूप सुंदर दिसतेस. साधेपणातलं तुझं सौंदर्य छानच. तुझे विचारदेखील छान आहेत. थोडसं खटकलं-मराठमोळ्या पेहरावात पदर नीट घेतला असतास तर अजून छान दिसलं असतं”. त्या कमेंटवर हेमांगी प्रतिउत्तर देत म्हणाली,”धन्यवाद. पदर नीट घेतला असता म्हणजे? हे एक बाईच कसं बोलू शकते? याचं नवल वाटतं मला..ते देखील तुमच्या सारख्या स्लीव्हलेस घातलेल्या बाईकडून यावं? मराठमोळ्या संस्कृतीत साडीवर स्लीव्हलेस ब्लाउज कधी होता जरा सांगता का? माझं अज्ञान तेवढचं दूर होईल”अस सडेतोड उत्तर दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button