Khirdi

खिर्डी येथे सात महिन्या नन्तर आठवडेबाजार भरला
रस्तावर दुकाने थाटल्याने वाहतूकीचा खोळंबा….

खिर्डी येथे सात महिन्या नन्तर आठवडेबाजार भरला
रस्तावर दुकाने थाटल्याने वाहतूकीचा खोळंबा….

खिर्डी प्रतिनिधी:- भीमराव कोचुरे
गेल्या मार्च महिन्यापासून सर्वत्र लाकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर जिल्हासह रावेर तालुक्यातील अनेक ठिकाणी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकार प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालनकरून, छोटे मोठे उद्योग व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. आज सात महिन्यांनंतर मंगळवारी आठवडेबाजार नियमित भरला होता. बहुसंख्य दुकानदारांनी तोंडावर मास्कचे लावलेले दिसत नव्हते,कोरोना समिती चे ,ग्रामपंचायतचे कर्मचारी कोणीही बाजारात कोरोना विषाणूं संदर्भात सुरक्षात्मकते साठी फिरकलेच नाही.
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाकडाऊन संपल्या नंतर आज प्रथमच मंगळवारी खिर्डी येथील आठवडेबाजार भरला. बाजारात व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, ग्राहकांनी ही चांगला प्रतिसाद दिला . पहिलाच बाजार असल्याने व्यापारी रस्तावर आपले दुकान मांडून बसले असता बलवाडीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत होती काहींच्या तक्रारी वाहतुकी बद्दल निर्माण झाल्या तसेच रीक्षांचे भाडे दुप्पट असले तरी ही ग्रामीण भागातील नागरिकांनी बाजारात खूप च गर्दी केली होती बाजार महाग असून सुद्धा ग्राहकांची गर्दी बाजारात दिसत होती

खिर्डी येथे आठवडे बाजार भरला असता दुकानदारांनी थेट रस्त्यातच आपली दुकाने थाटली असल्याने वाहतुकीस अडथडा निर्माण होत असल्याने त्यातच बाजारात ग्राहकांची गर्दी झाल्याने सदर ठिकाणी ट्रक,मालवाहू व इतर वाहने ये – जा करीत असून वाहन धारकांना साईड देण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने एखाद्या वेळेस वाहनांचे ब्रेक न लागल्यास अपघात झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल गावातील सुज्ञ नागरिक भिमराव कोचुरे यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button