Nashik

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ दोषमुक्त झाल्यावर नासिक मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ दोषमुक्त झाल्यावर नासिक मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-: महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ आणि इतरांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे महाराष्ट्र सदन प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर नाशिक येथील कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जल्लोष व आनंदोत्सव आनंद व्यक्त केला आहे.

दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडेतेरा कोटीची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करून आरोपपत्र दाखल केले होते त्यात पुरावे असल्याचे म्हटले होते पण कोर्टात आरोपीविरोधात कोणतेही सबळ पुरावे एसीपी ने दिले नाही त्यानंतर न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांनी दोषमुक्त करण्याचा अर्ज दाखल केला होता त्यात आपल्यावर केलेले आरोप निराधार असून दोषमुक्त करावे असे म्हटले होते या अर्जावर आज न्यायालयाने निकाल दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button