Rawer

जुन्या आठवणींना उजाळा देत तब्बल 17 वर्षांनंतर मित्र-मैत्रिणींची स्नेहसंम्मेलनाच्या माध्यमातून भेट..!

जुन्या आठवणींना उजाळा देत तब्बल 17 वर्षांनंतर मित्र-मैत्रिणींची स्नेहसंम्मेलनाच्या माध्यमातून भेट..!

रावेर /प्रतिनिधी-संदिप कोळी

निंभोरा बु. ता.रावेर येथील न्यु इंग्लिश स्कुल विद्यालयाची सन 2004 ची वर्ग 10 ही बॅच आज दिनांक 25 डिसेंबर २०२१ रोजी तब्बल 17 वर्षानंतर पुन्हा भेटली.
जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंधन अतूट राखण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हे स्नेह संम्मेलन आयोजित करण्यात आले.
सर्वप्रथम सरस्वती पूजन करून,सर्वांनी परिचय देऊन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन श्री. प्रल्हाद बॉंडे, मनोहर तायडे, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या ह्या कार्यक्रमात मनोरंजनासाठी गीत गायन प्रश्नमंजुषा पण ठेवण्यात आली.सचिन झाल्टे, शरद मालखेडे, प्रशांत पवार, मिनाक्षी मोरस्कर, गीतांजली कोंडे,मोहिनी चौधरी, रुपाली बऱ्हाटे,स्वप्नील चौधरी यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी
योगीता चौधरी,रुपाली बऱ्हाटे,शितल पाटील ,गितांजली कोडे,भुमीका सरोदे ,कामिनी कोंडे,रेखा फेगडे,रोहीणी बऱ्हाटे,मिनाक्षी मोरेस्कर, प्रज्ञा खाचने,दर्शना नेहते,मोहीनी वानखेडे,रीता ढाके,भावना बऱ्हाटे,दिपाली बोडे,करुणा महाजन ,प्रियंका सोनवणे,सोनाली दोडके,विशाल गाढे,मुकेश महाजन,राहुल बहाटे,गणेश विसे,प्रमोद बोडे,स्वप्नील चौधरी ,कपिल भंगाळे,किशोर बोरनारे,ललीत दोडके,विशाल तायडे,तुषार भंगाळे आदी सर्व मुंबई,पुणे,नाशिक ,खोपोली येथे स्थलांतरित असलेले मित्र मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
17 वर्षानंतर भेट झाल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या अनोख्या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सचिन झाल्टे,प्रशांत पवार, शरद मालखेडे, लखीचंद खाचने,कमलाकर नेमाडे, निलेश लोखंडे,घनश्याम खाचने,आरिफ पटेल आदींनी मेहनत घेतली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन झाल्टे ने तर आभार प्रदर्शन विशाल तायडे यांनी केले.
स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button