Pune

वडेश्वर येथे आद्यक्रांतिकार राघोजी भांगरे जयंती उत्साहात साजरी

वडेश्वर येथे आद्यक्रांतिकार राघोजी भांगरे जयंती उत्साहात साजरी

पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

मावळ तालुक्यातील वडेश्वर येथे आद्यक्रांतिकार राघोजी भांगरे यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.
ट्रायबल फोरम पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम हेमाडे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आले.
हेमाडे म्हणाले, राघोजी भांगरे यांच्या कार्य हे आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय आहे. त्यांना आम्ही आदर्श क्रांतीकारक मानतो. त्यांचा इतिहास हा आदिवासी तरुणांनी समजून देण्याची गरज आहे. राघोजी भांगरे यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्या वेळी राघोजी भांगरे यांना पकडून देण्यासाठी काही बक्षीस जाहीर केले होते. त्या वेळी काही फितूर लोकांनी राघोजी भांगरे हा पंढरपूर येथे आहे अशी माहिती इंग्रजांना दिली त्या वेळी पंढरपूर येथे राघोजी भांगरे यांना पकडले. सह्याद्री चा ढाण्या वाघ म्हणून राघोजी भांगरे यांची ओळख निर्माण झाली होती. अकोले तालुक्यातील देवगाव येथे राघोजी भांगरे यांच्या जन्म ८ नोव्हेंबर झाला. लहान पणापासून राघोजी हा हुशार होता. राघोजी ला अन्याय सहन होत नव्हता. अन्यायाविरुद्ध चिड होती. जे सावकार आदिवासी लोकांना लूट करत त्यांना मात्र राघोजी भांगरे व त्यांचे साथीदार मिळून हिशोब चुकता करत असत. कधी कधी तर सावकारांच्या मुड्या कापून टाकत असत. त्या मुळे आदिवासी समाजाने या पुढे अन्याय सहन करू नका असे प्रतिपादन पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम हेमाडे यांनी केले.
त्यावेळी ठाणे महानगर पालिकेचे कर्मचारी शंकर वायळ, पुणे महानगरपालिकाचे आदर्श शिक्षक सुभाष पारधी, वडेश्वर गावचे माजी उपसरपंच संदिपभाऊ लष्करी, उद्योजक राजूदादा हेमाडे, वडेश्वर गावचे युवा कार्यकर्ते सुरेशभाऊ वाजे आदी नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button