Amalner

Amalner: अमळनेर शहर वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड एस.एस ब्रम्हे, उपाध्यक्षपदी अॅड. व्ही.एन.चौधरी, सचिवपदी अॅड.आर.डी कछवा यांची निवड..

अमळनेर शहर वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड एस.एस ब्रम्हे, उपाध्यक्षपदी अॅड. व्ही.एन.चौधरी, सचिवपदी अॅड.आर.डी कछवा यांची निवड..

अमळनेर:-अमळनेर शहर वकील संघटनेची निवडणूक बुधवार 09 फेब्रुवारी बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी अॅड. एस एस ब्रम्हे यांची, उपाध्यक्षपदी अॅड. व्ही एन चौधरी यांची तर सचिवपदी अँड आर डी कछवा यांची निवड झाली आहे. पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करून बार मधील सगळ्या समस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ॲड. के व्ही कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तर, ॲड. एम जे अफुवाले यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून त्यांना सहकार्य केले.

शहर वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकमताने निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. अनुभवी व ज्येष्ठ वकिलांनी यामध्ये पुढाकार घेतला. निवडणूक अधिकारी ॲड. के व्ही कुलकर्णी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदासाठी ॲड. एस एस ब्रम्हे , उपाध्यक्षपदासाठी ॲड. व्ही एन चौधरी , सचिवपदासाठी अॅड आर डी कछवा यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संघटनेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संघटनेचे मावळते अध्यक्ष राकेश पाटील , उपाध्यक्ष व सचिव जयेश पाटील यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांचा सत्कार करून अभिनंदन केले. या वेळी विशेष सरकारी वकील अॅड के आर बागुल, अँड आर बी चौधरी,अॅड. सूर्यवंशी, अॅड.प्रशांत संदानशिव मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.सर्वत्र निवड झालेल्या मान्यवरांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button