Yawal

अ‍ॅड.देवकांत पाटील व योगिता पाटील यांचा न्यू बचपन प्ले स्कूल व माळीच क्लासेस यावल यांच्यातर्फे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह देत केला सत्कार …

अ‍ॅड.देवकांत पाटील व योगिता पाटील
यांचा न्यू बचपन प्ले स्कूल व माळीच क्लासेस यावल यांच्यातर्फे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह देत केला सत्कार …
यावल ( शब्बीर खान )

दिनांक 24 /10/2021 रोजी रविवारी दुपारी 1वाजेला यावल येथे माळीज सभागृहातील कार्यक्रमात अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भारतीय मानव अधिकार न्याय व सुरक्षा परिषद तथा अध्यक्ष यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विरावली व त्यांच्या सौभाग्यवती सौ. योगिता देवकांत पाटील सचिव छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन तथा सदस्य संजय गांधी समिती यावल यांचा न्यू बचपन प्ले स्कूल व माळीज क्लासेस चे संथापक अध्यक्ष श्री कैलास माळी सर यांनी व त्यांच्या सहकारी संचालक मंडळ यांनी
अ‍ॅड.देवकांत पाटील व योगिता पाटील यांच्या सामाजिक , शैक्षणिक ,राजकीय कार्याची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन च्या माध्यमातून राबवलेले विविध उपक्रम त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नवनवीन नावीन्य पूर्ण प्रयोग याची दखल घेत तसेच कोरूना काळात केलेली जनजागृती , मास वाटप ,सॅनिटायझर वाटप, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा,स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन शिबिर , बेसिक संगणक शिबिर , कोरोना काळात राज्यस्तरीय महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त घेतलेली ऑनलाईन स्पर्धा , तसेच रक्त तपासणी शिबिर ,रक्तदान शिबिरे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे ,वृक्ष लागवड ,वृक्ष संवर्धन , स्वछता विषयी जनजागृती स्मशान भूमीत साफ सफाई अभियान राबवणे नियमित पणे सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम घेणे सामाजिक क्षेत्रात नेहमी सर्वांना मदत करत राहणे राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून सामाजिक विषयांना हात घालत राहणे जनहिताचे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गे लावण्याचे महत्त्वपूर्ण योगदान याची दखल घेत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह शॉल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक कैलास माळी तर सूत्रसंचालन सुधाकर बाऊस्कर यांनी केले.यामध्ये सामाजिक क्षेत्रातील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील,नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,ॲड.देवकांत पाटील तर शैक्षणिक क्षेत्रातील माजी प्राचार्य सुरेश वाघ,मुख्याध्यापक नितीन झांबरे,प्रा.नंदन वळींकार,सुनिल माळी,प्राचार्य एम. के.पाटील,स्निग्धा जोशी,सतिश मोरे आदींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ.जागृती फेगडे,सुनिल देशमुख,गणेश देशमुखे, सुरेखा माळी , छत्रपती फाऊंडेशन संचालक पवन पाटील , हितेश गजरे ,गिरीष पाटील ,किशोर माळी आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे आयोजक कैलास माळी सर यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button