Yawal

कासारखेडा येथील प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या; यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

कासारखेडा येथील प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या; यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

यावल ( शब्बीर खान ) तालुक्यातील कासारखेडा येथील ४९ वर्षीय प्रौढ अल्पभुधारक शेतकरी व्यक्तीने आपल्या राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी २७ ऑक्टोबर दुपारी २ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विकास पुना कुंभार (वय-४९) रा. कासारखेडा ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. मयत हे विकास कुंभार हे प्रसंगी हाताला मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात त्यांच्या कुटुंबात पत्नी , एक मुलगा व दोन मुली आहेत. आज बुधवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना झोक्याच्या दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कैलास पंढरीनाथ कुंभार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजिज शेख हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button