Parola

बोरी नदी काठावरील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

बोरी नदी काठावरील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

प्रतिनिधि-प्रवीण पाटिल- काहीं दिवसाची विश्रांती घेत पाऊसाने जळगांव जिल्हया सह इतर जिल्ह्यांना ही चांगलाच चोप दिला, पाऊसाचे आगमनाने नदी नाले वाहून निघाले, जळगांव जिल्ह्यातील पारोळा येथील तामसवाडी धरण हे पूर्ण भरून निघाले बोरी नदी वरील ह्या धरणाची पाण्याची पातळी पूर्ण झाल्या मुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणत सोडण्यात येतो, तसेच उत्तर महाराष्ट्र भागात 6 ते 11 स्पटेंबर दरम्यान हवामान खात्याने अतिवृष्टी चा इशारा दिला आहे ह्या मुळे प्रशासन कामाला लागले आहे महलापुर बहादरपुर, व नदी काठावरील गावांना तहसीलदार अनिल गवंदे यांनी भेटी दिल्या व काठावरील नाकरिकाना सतर्कतेचे आव्हान केले, तसेच प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी ग्रामस्थांना सूचना देऊन योग्य ते मार्गदर्शन केले यावेळी बोरी काठवरील ग्रामस्थ व पोलिस पाटिल उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button