Pandharpur

महाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी ग्राम संवाद सरपंच संघाचे सतिश भुई व सर्व पदाधिकारी यांचे केले कौतुक…

महाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी ग्राम संवाद सरपंच संघाचे सतिश भुई व सर्व पदाधिकारी यांचे केले कौतुक…

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : “ग्राम संवाद सरपंच संघ ” महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन औरंगाबाद येथे महाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे यांच्या शुभहस्ते संपन्न. ::: महाराष्ट्र राज्य स्तरावर कार्यरत असलेली “ग्राम संवाद सरपंच संघ” या सरपंच संघाचे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर खूप चांगले कार्य चालू आहे सरपंच संघाचा मुख्य उद्देश असा आहे की, प्रत्येक गावातील आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य यांना त्यांच्या कर्तव्याची व हक्काची जाणीव करून देणे व गावातील प्रत्येक घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचण्याचे काम सरपंच यांच्यामार्फत करणार आहे, शासनाच्या नवीन योजना विषयी सरपंच उपसरपंच सदस्य नवीन असतील तर कामाचा अनुभव नसल्यामुळे व योग्य माहिती नसल्याने प्रबळ इच्छाशक्ती असून सुद्धा शासकीय योजना राबवताना गाव विकासापासून वंचित राहते म्हणून सरपंच संघामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे व महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आदर्श करण्याच्या दृष्टीने सरपंच संघ प्रयत्न करणार आहे असे मत आजिनाथ धामणे यांनी व्यक्त केले, अध्यक्षीय भाषण करताना श्री भास्करराव पेरे पाटील दादा यांनी झुम मीटिंग द्वारे महाराष्ट्रातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना “ग्रामविकासाच्या वाटा “याविषयी बोलताना म्हणाले की, या सरपंच संघामधील महिलांना दिलेली संधी पाहून मला खूप आनंद वाटला जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्यावर आपापली ठरवून दिलेली जबाबदारी पार पाडली तर महाराष्ट्रातील प्रत्येक सरपंचाला काम करायला सोपे होईल , सर्व गोष्टी या गावातच उपलब्ध असतात त्या सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी करून घेतल्या पाहिजेत शासनाच्या पैशातून सरपंच यांना गावाचा विकास करायचा असतो त्याकरता सरपंच संघामार्फत माहिती व मार्गदर्शन घेऊन केला तर गाव विकासासाठी नक्कीच त्याचा फायदा होईल, ग्राम संवाद सरपंच संघाचे कौतुक करताना भास्करराव पेरे दादा म्हणाले की, ग्रामसंवाद सरपंच संघ ही सरपंच संघटना महाराष्ट्र मध्ये सर्व गावापर्यंत पोहोचत असून संघटनेचे सर्व पदाधिकारी खूप चांगले संघटन करुन मार्गदर्शन करत आहेत असेच मार्गदर्शन यापुढेही करत राहावे व सरपंच संघाच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून नेहमीच मार्गदर्शन राहील पुनश्च एकदा सर्व पदाधिकारी सदस्य यांना शुभेच्छा. यावेळी ग्राम संवाद सरपंच संघाचे प्रदेश सचिव श्री विशाल लांडगे यांनी आभार व्यक्त केले राज्य प्रवक्ता श्रीभाऊसाहेब काळे राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री अजित सिंग राजपूत झूम मीटिंग द्वारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतिश भुई व सर्व पदाधिकारी सदस्य इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button