MaharashtraShindkgeda

उपक्रमशील शिक्षकाने रंगवली स्वतःच्या कल्पकतेने पाष्टे ची शाळा….

उपक्रमशील शिक्षकाने रंगवली स्वतःच्या कल्पकतेने पाष्टे ची शाळा

अमोल बैसाने

शिंदखेडा
श्री गौरव सहदेवराव अढाऊ मूळचे अमरावती जिल्ह्यातील. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे या गावी त्यांची 2011 ला नियुक्ती झाली.. तेव्हा पासून ते आजपर्यंत पाष्टे येथील जि. प. शाळेला कार्यरत आहे..या नऊ वर्षा मध्ये त्यांनी शाळेत बरेच बदल घडून आणले. आणि त्या मधील एक म्हणजे स्वतःच्या कल्पकतेने त्यांनी स्वतःची शाळा रंगवली.. आपल्या चित्रकलेच्या जोरावर त्यांनी या शाळेचा पार चेहरा मोहरा च बदलून टाकला आहे.. आकर्षक रंग रंगोटी करून शाळा डिजिटल केली आहे..

उपक्रमशील शिक्षकाने रंगवली स्वतःच्या कल्पकतेने पाष्टे ची शाळा....

ज्या रंगरंगोटीला चाळीस ते पन्नास हजार खर्च येणार होता तो अल्पश्या खर्चात त्यांनी स्वतः मेहनत घेऊन साकार केला.सदर शिक्षक जिल्ह्यातील कुठल्याही जिल्हा परिषद शाळेला अशी मदत करायला तयार आहे.
या शाळे मध्ये मागील वर्षा पासून सेमी इंग्रजी ची सुरवात केली आहे.त्यांची धुरा सुद्धा त्यांनी इयत्ता पहिली पासून सामभाळली आहे.शाळेत विविध उपक्रम राबविले जाते.शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. बाळू संतोष पवार याच्या काटेकोर नियोजनामुळे येथील शाळा नावारूपास येत आहे.

उपक्रमशील शिक्षकाने रंगवली स्वतःच्या कल्पकतेने पाष्टे ची शाळा....

श्री.हिम्मत माळी, श्री. सुनील पाटील, श्री. महेंद्र पाटील, श्री.बोरसे सर, श्री. गौतम सर, श्री.महेंद्र लोटन पाटील सर असे कार्यकुशल, तंत्रस्नेही शिक्षक या शाळेला लाभले आहे… म्हणून च शाळा आज नावारूपास येत आहे.. सदर शाळेला एकदा नक्की भेट द्या..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button