Aurangabad

विजचोरी करणार्‍या 32 जणांवर कारवाई करण्यात आली..

विजचोरी करणार्‍या 32 जणांवर कारवाई करण्यात आली..

प्रतिनिधी/गणेश ढेंबरे

औरंगाबाद :- आज दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी 33/11 केव्ही गारज शाखेच्या अंतर्गत दोन गावांमध्ये जाऊन विज चोरी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले असुन केबल तसेच विजेवर चालणाऱ्या मशिन इत्यादी कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य बाबुळगाव पिराचे व भोकरगाव येथे पकडण्यात आले.,

वैजापूर-2 चे उपकार्यकारी अभियंता मा. श्री. पुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, बाबुळगाव पिराचे व भोकरगाव येथील विजचोरी करणारे (लाईन च्या तारेवर आकडे टाकुन विजचोरी करणारे) या दोन गावांमध्ये आकडे टाकून वीज चोरी करणारे एकूण 32 जणांवर कार्यवाही करण्यात आली.

ही सदर कारवाई गारज युनिट चे कनिष्ठ आभियंता शेख मोहम्मद हकीम अब्दुल करीम, श्री. एस.जे. शिंदे (लाईनमन ) श्री. ए. पी. सोनवणे (वरिष्ठ तंत्रज्ञ) श्री. एम. एस. गवळी (वरिष्ठ तंत्रज्ञ) श्री. एस. पी. निकम (वरिष्ठ तंत्रज्ञ) आर. एस. शिरगोळे (वरिष्ठ तंञज्ञ) श्री. अंकुश तुपे तसेच श्री. श्रावण शिंदे यांच्या पथकाने (वरील सर्व कर्मचारी वर्ग) यांनी कार्यवाही केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button