Nandurbar

गांजाची शेती करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 8 लाख 30 हजार 690 रुपये किमंतीचा गांजा जप्त

गांजाची शेती करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 8 लाख 30 हजार 690 रुपये किमंतीचा गांजा जप्त

नंदुरबार फहिम शेख

मा. पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशान्वये संपुर्ण नाशिक परिक्षेत्रात N.D.P.S. बाबत विशेष मोहिम राबवुन त्याचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक 02/11/2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत शहादा तालुक्यात घोटाळी येथे एका इसमाने त्याचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील साहेब यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार व त्यांचे अमंलदार हे घोटाळी गावाचे शिवारातील पाण्याचे तलावाजवळील कापसाचे पीक असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर बातमीमधील संशयीत एका कापसाचे पिकाचे शेतात हालचाली करत असल्याचे दिसुन आले, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथुन पळ काढला त्याचा पाठलाग केला असता तो जंगलात पळुन जाण्यात यशस्वी झाला. त्या इसमाच्या कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिक ठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले, म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपुर्ण शेती पिंजून काढली असता तेथे 118 किलो 67 ग्रॅम वजनाचे 8 लाख 30 हजार 690 रुपये किंमतीची एकुण 83 गांजाची झाडे मिळुन आल्याने संशयीत फाडया भंगी पावरा रा.घोटाळी ता.शहादा याचे शेतात मिळुन आलेले गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात त्याचेविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 अन्वये शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे. शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे, प्रमोद सोनवणे, सजन वाघ, विनोद जाधव, मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, बापु बागुल, विशाल नागरे, राकेश वसावे पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, दिनेश लाडकर, संजय रामोळे, पोलीस अमंलदार विजय ढिवरे, यशोदिप ओगले, चालक संजय बोरसे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिपक परदेशी, पोलीस अमंलदार भरत ओगले, दिनकर चव्हाण यांचे पथकाने केली असुन मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button