Yawal

मालोद कोतवाल सह पटंरावर लाचलुचपत विभागाची कारवाई

मालोद कोतवाल सह पटंरावर लाचलुचपत विभागाची कारवाई

/यावल तालुका प्रतिनिधी
अमित एस तडवी

तालुक्यातील सावखेडासिम शिवारातील शेत गटांमधील इतर अधिकारात असलेले बहिणीचे नाव कमी करून मिळावे यासाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी करण्याऱ्या मालोद येथील कोतवालासह एकास मंगळवारी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडेल या कारवाई मुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.
नायगाव ता यावल येथील ५० वर्षीय तक्रारदार यांचे सावखेडासिम तालुका यावल येथे शेत आहे या शेतामध्ये इतर अधिकारांमध्ये त्यांच्या बहिणीच्या नावाची नोंद आहे ते नाव कमी करण्यासाठी मंडळ अधिकारी किनगाव यांच्या कडे त्यांनी अर्ज केला होता तेव्हा सदर नाव कमी करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी मालोद ता. यावल येथील कोतवाल जहांगीर बहादुर तडवी यांनी केली होती व ते पैसे आज मंगळवारी किनगाव येथील विद्या जनरल स्टोर चे संचालक मनोहर दयाराम महाजन यांच्याकडे देण्याचे सांगितले होते तेव्हा संशयित कोतवाल याने मंगळवारी ती रक्कम स्वीकारली असताना सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव बच्छाव एन एन जाधव सहायक फौजदार दिनेश सिंग पाटील सुरेश पाटील हवालदार अशोक आहिरे हवालदार सुनील पाटील शैला धनगर मनोज जोशी जनार्धन चौधरी प्रविन पाटील महेश सोमवंशी नाशिक देशमुख प्रदीप पवार या पथकाने केली तर दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक एन जाधव करीत आहे त्या महसूल विभागात झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button