मारवड

मारवड हद्दीतील शिरसाळे येथे मारवड पोलिसांची धाड… हातभट्टी आणि जुगार खेळणाऱ्यांवर कार्यवाही

मारवड हद्दीतील शिरसाळे आणि अमळगाव येथे मारवड पोलिसांची धाड… हातभट्टी आणि जुगार खेळणाऱ्यांवर कार्यवाही…

श्री पंजाबराव उगले,पोलीस अधीक्षक सो जळगाव श्री सचिन गोरे सो अपोअ.चाळीसगाव व श्री राजेंद्र ससाणे उविपोअ अंमळनेर यांचे आदेश व मार्गदर्शनानुसार मारवड हद्दीतील शिरसाळे गाव भेटी दरम्यान गोपनिय माहिती मिळाली त्यानुसार रेखाबाई बशीर खाटीक वय-५२ यांना रु.८४००/- चे जिवंत गावठी हातभट्टी व कच्चे रसायन साहित्य साधनांसह, तसेच नामे सिंधुबाई भिका भिल वय-५२ घरामागे मोकळ्या जागेत रु.१५००/- चे तयार गावठी दारुसह तर सलीम बशीर खाटीक वय-५७ यास पिंपळे रोडला नाल्यालगत रु.३०००/- चे तयार गावठी हातभट्टी दारुसह छापा मारुन पकडले व त्यांचेवर प्रो.गुरनं.५८/१९, ५९/१९ व ६०/१९ मदाका क.६५(ई)(फ)(ग) प्रमाणे कारवाई केली.
तसेच अंमळगावा येथे देखील गोपनिय माहिती नुसार सुरेश मोहन बोरसे वय-३८ हा रु.३८०/- चे जुगार साहित्य साधनांसह व जगदिश माधवराव चौधरी वय-४५ हा रु.६६०/- चे जुगार साहित्य साधनांसह कल्याण नावाचा मटका जुगार खेळवितांना आढळून आल्याने त्यांचेवर छापा मारुन भाग ६ गुरनं.२९/१९ व ३०/१९ मजुका.क.१२(अ) प्रमाणे कारवाई सुरु आहे.

Leave a Reply

Back to top button