Nandurbar

नंदुरबार बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ निर्घण खून करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन गुजरात राज्यातून अटक

नंदुरबार बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ निर्घण खून करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन गुजरात राज्यातून अटक

नंदुरबार फहिम शेख

दिनांक 26/08/2021 रोजी बिलाड़ी नंदुरबार शिवारातील गट क्र. 498 च्या शेताच्या बांधाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ झाडाझुडपात एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने स्थानिक नागरीकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत कळविल्याने मा. पोलीस अधीक्षक साो श्री. महेंद्र पंडित, मा, अपर पोलीस अधीक्षक सो श्री. विजय पवार मा. उप विभागीय पोलीस अधीकारी श्री. सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पडलेल्या मृतदेहाची पाहणी केली असता लाल कुर्ता व पांढरी पँट घातलेली एक अनोळखी महिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेली होती. तसेच मृत महिलेचा एक हात धडापासून वेगळा पडलेला होता व एका हातावर तिक्ष्ण हत्याराने झालेल्या जखमेच्या खुणा दिसत होत्या. सदर बाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक गणेश बापु सुर्यवंशी यांचे फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

घडलेली घटना अतिशय निर्घुण होती मयताचे डोके व एक हात धडापासुन वेगळे होते डोक्याची कवटी फक्त घटनास्थळावर होतो, घटना सुन्न करणारी होती. म्हणून मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. महेंद्र पंडित सो, मा. अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. विजय पवार साठे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविद्र कळमकर यांचेशी गुन्ह्याबाबत सविस्तर चर्चा करुन गुन्हा उघडकिस आणण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.

घटनास्थळावर मयताची ओळख पटु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती. तसेच सदरचा गुन्हा हा कधी घडला याबाबत कोणतीही माहिती नसल्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे व मयताची ओळख पटविण्याचे तसेच जिवेटार मारण्याचा उद्देश काय? याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.

दिनांक 29/08/2021 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना एका गुप्त बातमीदाराने बातमी कळविली की, पाचोराबारी येथील रेल्वे फाटकाजवळ राहणारे कल्पेशभाई पटेल यांचे घरौं सी. सी. टी व्ही कॅमेरे आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी एका पथकास लागलीच पाचारोबारी येथे पाठवून सी. सी. टी. व्ही फुटेजची तपासणी करणेबाबत सांगितल्याने दिनांक 24/08/2021 रोजी रात्री सुमारे 09.30 वा. सुमारास एक तरुण व एक तरुणी नंदुरबारच्या दिशेने जाताना दिसून आले व जात असलेली तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मयताच्या अंगावर मिळुन आलेल्या कपड्याच्या वर्णनाची मिळते जुळते होते. मिळालेले सी.सी.टी.व्ही. फुटेज हे रात्रीच्या अंधारात असल्यामुळे अतिशय अस्पष्ट होते.

.तसेच डेकवद येथील रेल्वे ट्रॅकमनने दि. 24/08/2021 रोजी सुरत ते भुसावळ पॅसेंजरमधुन एक तरुण व एक तरुणी ढेकवद स्टेशनला उतल्याचे पाहिले अशी माहिती दिल्याने पोलीस निरीक्षक श्री. रविद्र कळमकर यांनी पाचोराबारी ते सुरत दरम्यान असलेल्या सर्व 21 स्थानकांचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासण्यासाठी एक पथक गुजरात राज्यात रवाना केले. दिनांक 31/08/2021 रोजी सुरत रेल्वे स्टेशन व स्टेशनच्या बाहेर असलेले सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करीत असतांना सुरतच्या रेल्वे प्लॅट फॉर्मवर संशयीत आरोपी व मयत तरुणीच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या वर्णनाप्रमाणे कपडे घातलेली तरुणी दिसून आले. आणखी इतर सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची पाहणी केली असता एका रिक्षातुन तेच संशयीत तरुण व मयत तरुणी उतरतांना दिसले. म्हणून रिक्षा चालकाच्या मदतीने संशयीत इसम व मयत महिला बांचा मार्गक्रमन निश्चित केला. त्यांनी एका ठिकाणी रिक्षा बदललेली दिसली. त्या रिक्षा चालकाच्या मदतीने देखील पुन्हा मार्गक्रमण निश्चित केला. संशयीत तरुण व मयत तरुणी हे कापुदरा चौक, कब्रिज ब्रीज येथे रिक्षात बसतांना दिसुन आले म्हणून परिसरातील सर्व रिक्षा चालकांकडून माहिती घेण्यात आली. परंतु उपयुक्त अशी कोणतीही माहिती पथकाला मिळत नव्हती.दिनांक 04/09/2021 रोजी नवागांम सुरत येथील Ultra life Style ह्या कपड्याच्या दुकानाचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत असताना तेथे देखील संशयीत तरुण व मयत तरुणी हे दिसून आले दुकान मालकाकडुन त्याची माहिती घेवून त्या माहितीच्या आधारे संशयित इसमास ताब्यात घेतले.

दिनांक 05/09/2021 रोजी संशयीत इराम नामे विनयकुमार रामजनम राय वय 38 रा खमहारी पो. राजापुर ता. महाराजगंज जि. सिवन बिहार यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार येथे आणून विचारपुस केली असता संशयीत आरोपीताने अतिशय धक्कादायक अशी माहिती दिली. मयत तरुणीचे नाव सिताकुमारी समदकुमार भगत वय-24 रा. चमारीया चैनपुर ता. मशरद ति छपरा असे सांगून मयत तरुणी देखील आरोपीच्या गावाजवळील होती व दोन्हींचे मागील दोन वर्षापासून प्रेम संबंध होते. मयत तरुणी दिनांक 23/08/2021 रोजी बिहार येथून सुरत येथे संशयीत आरोपीकडे आली तेथे आल्यानंतर मयत तरुणीने संशयीत तरुणाशी विवाहासाठी तगादा लावला त्यावेळेस संशयीत तरुणाने विवाहीत असल्याचे मयत तरुणीला सांगितल्याने त्यांचा वाद झाला म्हणून संशयीत तरुणाने मयतास पुन्हा बिहार येथे तिच्या मुळ गावी सोडण्यासाठी सुरत येथुन दिनांक 24/08/2021 रोजी सुरत भुसावळ पैसेजरने रवाना झाले, परंतु रेल्वेमध्ये देखील मयत तरुणी संशयीत आरोपोशी बाद करत असल्याने संशयीत आरोपी ढेकवद रेल्वे स्थानकावर उतरुन गेला तसेच मयत तरुणी देखील त्याच्या मागे ढेकवद रेल्वे स्थानकावर उतरली. दोन्ही काही वेळ पायी चालत गेल्यानंतर संशयीत आरोपीताने रात्रीच्या अंधाराचा व एकांताचा फायदा घेत बिलाडी नंदुरबार शिवारात रेल्वे ट्रॅकजवळ एका

शेतातील बांधाच्या बाजुला काटेरी झुडपात नेवुन सदर तरुणीस ब्लेडने गळा चिरुन जिवे ठार मारल्याचे कबुल केले, कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तांत्रिक पुरावा नसतांना अतिशय क्लिष्ट व आव्हानात्मक गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे ताब्यात घेतलेल्या आरोपीतास गुन्ह्याच्या पुढील कारवाईकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक श्री विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे पोलीस नाईक सुनिल पाडवी, बापु बागुल, मनोज नाईक पोलीस अमंलदार किरण मोरे, यशोदिप ओगले, चालक पोलीस शिपाई सतिष घुले यांच्या पथकाने केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button