Faijpur

पाडळसे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘आशा डे’ निमित्त विविध कार्यक्रम संपन्न नारीशक्ती गृप तर्फे सन्मानचिन्ह देऊन आशाताईंचा गौरव

पाडळसे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘आशा डे’ निमित्त विविध कार्यक्रम संपन्न नारीशक्ती गृप तर्फे सन्मानचिन्ह देऊन आशाताईंचा गौरव

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : ग्रामीण भागात प्रत्यक्ष रुग्णांशी संपर्क साधून आरोग्य विषयक जनजागृती करणार्या आशा स्वयंसेवीकांसाठी हक्कांचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणारा ‘आशा डे’ शनिवारी पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले.आशा गटप्रवर्तक सौ.निलिमा योगेश ढाके व सौ.अर्चना विनोद सोनवणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी आशा स्वयंसेवीकांसाठी संगित खुर्ची,निंबू चमचा,सुंदर हस्ताक्षर आणि वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या आशाताईंना खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कोरोना काळात महत्वपूर्ण कामगिरी बजावत सेवा दिल्याबद्दल प्रांताधिकारी कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन आशा स्वयंसेवीकांचा सन्मान करण्यात आला.सुत्रसंचालन सौ.निलिमा ढाके व आभार सौ.अर्चना सोनवणे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button