Paranda

?Crime Diary…घरफोडी प्रकरणातील आरोपी २४ तासात परंडा पोलिसांच्या जाळ्यात मुद्देमाला सह अरोपी अटक

घरफोडी प्रकरणातील आरोपी २४ तासात परंडा पोलिसांच्या जाळ्यात मुद्देमाला सह अरोपी अटक

सुरेश बागडे परंडा

परंडा : घरात कोणी नसल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्याने भुम तालूक्यातील ईडा येथील राहुल भोसले यांच्या घरातील फ्रीज , कुलर सह घरातील सामानाची चोरी प्रकरणातील आरोपीस परंडा पोलिसांनी २४ तासात अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की परंडा तालूक्यातील जवळा (नि) पोलिस दुरक्षेत्राच्या हद्दीतील ईडा येथील राहुल भोसले हे कामा साठी मुंबई येथे मागील दोन महिन्या पुर्वी गेले होते तर त्यांची पत्नी प्रियंका ह्या माहेरी गलेल्या होत्या घरात कोणी नसल्याची संधी साधून यातील आरोपी ने घरातील फ्रीज , कुलर , पितळी घागर स्टील टाकी असा १३ हजाराच्या मालाची चोरी केली होती

राहुल भोसले यांचे चुलत भाऊ विकास भोसले यांना दि १ मार्च रोजी त्यांचा भाऊ राहुल भोसले यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात कोणी नसल्याचे दिसल्याने त्यांनी राहुल यास तु गावी आला आहेस का असे फोन करून विचारले असता राहुल भोसले यांनी मी मुंबई येथेच असल्याचे सांगीतल्याने विकास भोसले यांनी माहेरी गेलेल्या त्यांच्या भावजयी प्रियंका यांना फोनवर माहिती दिल्याने त्यांनी संध्याकाळी ईडा येथे येऊन पाहणी केली असता घरातील सामानाची चोरी झाल्याचे दिसून आले .
या प्रकरणी विकास भोसले यांनी जवळा पोलिस चौकीत फिर्याद दिल्याने अज्ञात चोरा विरूद्ध दि १ मार्च रोजी चारीचा गुन्हा दाखल करून तपास पोलिस नाईक मारूती कळसाईन यांच्या कडे देण्यात आला

पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस नाईक कळसाईन यांनी या चोरी प्रकरणी गुप्त बातमीदारा कडून माहिती काढून ईडा येथील संशयीत आरोपी संदीप भोसले यास २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी संदीप भोसले याने गुन्ह्याची कबुली दिली असुन आरोपीच्या घरातुन चारलेले सामान जप्त करण्यात आले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button