Pune

अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार व्हावेत- पो.उप निरिक्षक शंकर मुठेकर

अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार व्हावेत- पो.उप निरिक्षक शंकर मुठेकर

दत्ता पारेकर पुणे

पुणे : अपघातग्रस्तांना व्यवस्थित रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी ” हायवे मृत्युंजय दूत ” ही योजना राज्यात राबवली जाणार आहे.पुणे सोलापूर राष्ट्रीय राजमार्गावतील इंदापूर पोलिस मदत केंद्राच्या माध्यमातून अपघात ग्रस्तांना तात्काळ मदत करण्यासाठी स्थानिक युवकांच्या मदतीतून मृत्युंजय देवदूत ग्रुप स्थापन करुन या ग्रुपच्या माध्यमातून मदत पुरवली जाईल असे प्रतिपादन पोलीस उप निरीक्षक शंकर मुठेकर यांनी केले.

आज दि १ मार्च रोजी इंदापुर येथील सरडेवाडी येथे स्वामीराज हॉटेल समोर ही मृत्यूंजय दूत हे अभियान डॉ. भूषणकुमार उपाध्याय, संजय जाधव,प्रीतम यावलकर, राजन सस्ते, यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुर पोलीस मदत केंद्राडून राबवण्यात आले.यावेळी ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्रेनिक शहा, चित्तरंजन पाटील, पत्रकार डॉ संदेश शहा,गफूर सय्यद, नगरसेवक प्रशांत शिताप,आदी उपस्थित होते.

महामार्गावरील माल, पेट्रोलपंप, लोकल ढाबे, हाॅटेलात काम करणारे कर्मचारी महामार्गावरील शेजारील गावातील चारपाच लोकांचा गृप तयार करुन त्या गृपला ” मृत्युंजय देवदूत” या नावाने ओळखले जाईल. या देवदुतांना अपघातातील प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या देवदुतांच्या प्रत्येक एका गृपला प्रथमोपचाराचे साहीत्य दिले जाणार आहे. त्यांना रुग्णवाहीका, सरकारी दवाखाना, पोलिसठाणे, यांचे संपर्क क्रमांक आणी पत्ते दिले जातील. महामार्गावर ” हायवे मृत्युंजय दूत ” यांना महामार्ग सुरक्षा पथकाकडुन ओळखपत्र देण्यात येणार आहे.असे पोलीस उप निरीक्षक शंकर मुठेकर यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button