Dhule

ओम क्रिटिकल केअर सेंटर हॉस्पिटल येथे गरीब रुग्णाची लूट थांबविणे बाबत तसेच सदर हॉस्पिटल वर कायदेशीर कारवाई करणे बाबत.

ओम क्रिटिकल केअर सेंटर हॉस्पिटल येथे गरीब रुग्णाची लूट थांबविणे बाबत तसेच सदर हॉस्पिटल वर कायदेशीर कारवाई करणे बाबत.


धुळे: वरील विषयांवर सादर करतो किओम क्रिटिकल सेंटर येथे मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी 8/6 /2020 रोजी नितीन संजय अहिरे नामक पेशंट दाखल करण्यात आले होते पेशंट कडे पैसे कमी असल्यामुळे व त्याची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्याचे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत करण्यात आले.
ऑपरेशन करण्यापूर्वी डॉक्टर देव तिवारी व डॉक्टर राहुल बिर्ला यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना भीती निर्माण केली व पेशंट च्या वडिलांकडून एक लाख 40 हजार रुपये घेतले व डॉ राहुल बिर्ला यांनी सांगितले की पैसे घेतल्याचे कोणालाही सांगू नका असे सांगितले महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ऑपरेशन केल्याने पेशंटला एकही रुपया खर्च येत नाही.व डॉ. राहुल बिर्ला यांनी खर्च द्यायला नको होता तरी डॉ देव तिवारी आणि डॉ राहुल बिर्ला यांनी अशा प्रकारे पैशाची मागणी केली त्याप्रमाणे रुग्णाच्या नातेवाईकांनी पैसे दिले कारण रुग्णाची प्रकृती गंभीर होती
व सदर पहिल्या ऑपरेशनचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य मार्फत डॉक्टर राहुल बिर्ला यांनी 54 हजार रुपये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ही पैसे पास केलेला आहे.
सदर पेशंट ची परिस्थिती फार गंभीर आहे व दुसरे ऑपरेशन करण्याचे गरजेचे आई तरीही ऑपरेशन लवकरात लवकर करण्यात यावे व पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टर बिर्ला यांना एक लाख 40 हजार रुपये दिले आहेत ते पैसे वापस करण्यात यावे.
तसेच जनतेची लूट करणाऱ्या व शासनाची फसवणूक करणाऱ्या ओम क्रिटिकल सेंटर हॉस्पिटल वर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा ऑल इंडिया पेंटर सेना ही आक्रमक भूमिका घेईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. सदर निवेदन देतांना उपस्थित पेशंट चे वडील संजय दामू अहिरे व पदाधिकारी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते कायदेशीर सल्लागार एडवोकेट विलास जी भामरे जितेश जी सोनवणे किरण धिवरे अशोक धिवरे भाऊसाहेब बळसाने आनंद अमृत सागर भिकन घोलप बाविस्कर अक्षय बर्डे संजय थोटे सोनू जमदाडे गोपी कासोदे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button