Amalner

पांझरा पोळ ( जैन संघ ) गौशाळेत लायन्स क्लबच्या सौजन्याने जनावरांना लंम्पी डीसी लसीकरण संपन्न..

चोपडा रोडवरील पांझरा पोळ ( जैन संघ ) गौशाळेत लायन्स क्लबच्या सौजन्याने तेथील सुमारे ४५० बैल,गायी,व इतर जनावरांना लंम्पी डीसी लसीकरण पशु वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ प्रतिभा गोरे,पंचायत समिती माजी सभापती श्याम अहिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले

अमळनेर : येथिल चोपडा रोडवरील पांझरा पोळ ( जैन संघ ) गौशाळेत लायन्स क्लबच्या सौजन्याने तेथील सुमारे ४५० बैल,गायी,व इतर जनावरांना लंम्पी डीसी लसीकरण पशु वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ प्रतिभा गोरे,पंचायत समिती माजी सभापती श्याम अहिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले
यावेळी अरुण कोचर यांनी प्रास्ताविक केले या गौ शाळेला भरपुर वर्ष झालीत आज रोजी 450 गुरे आहेत,दोन ते अडीच लाख महिन्याला खर्च येतो शाळेला शासनाचे कुठलेही अनुदान नाही परंतु शहरातील गो प्रेमी,दानशूर व्यक्ती यांच्या मार्फत ही सेवा सुरू आहे तर लायन्स क्लब चे योगेश मुंदडा यांनी सांगितले की
यापुढे लायन्स क्लब सहकार्य करणार शहरातील भानुबेन गौ शाळेतील व शिरूड येथिल गौ शाळेतील जनावरांना देखील लसीकरण केले जाईल व जेव्हढी मदत श्यक्य होईल तेव्हढी देऊ असे अश्वासन दिले तर श्रीमती डॉ गोरे यांनी देखील मदतीचे आव्हान केले.
यावेळी राजेंद्र देसरडा,डॉ दीपक पाटील,योगेश मुंदडा,विनोद अग्रवाल,डॉ रवींद्र जैन,दिलीप जैन,जितेंद्र जैन,मनोज जीवनानी,सुनील छाजेड,अजय हिंदुजा, प्रसन्न जैन आदी उपस्थित होते तर सदर कार्यक्रमास ज्ञानेश्वर धनगर यांचे सहकार्य लाभले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button