Pandharpur

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गैरकारभाराविरुद्ध अभिजीत पाटील यांनी केली विविध माहितीची मागणी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गैरकारभाराविरुद्ध अभिजीत पाटील यांनी केली विविध माहितीची मागणी

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विविध गैरकारभारविरुद्ध डी व्ही पी ग्रुपचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांनी विविध प्रकारची माहिती मागितली असून ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची मागणी केली आहे. पाटील यांनी रविवार दि२६सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वा समृद्धी ट्रॅक्टर शोरूम मध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गळीत हंगामात कोणकोणत्या बँकेतून ,किती कर्ज घेतले. याचा वापर कुठे करण्यात आला. संचालक मंडळ आणि त्यांच्या नातेवाईकांकडे किती कर्ज आहे.वसुलीबाबत काय केले. साखर पोत्यांची चोरी झाली असल्याची माहिती असून याबाबत सखोल चौकशी करून संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी.एफ आर पी न देता शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळास दोषी धरून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. मॉलॅसिस विक्रीतही भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी आणि तोडणी वाहतूकदार यांची कोट्यवधी रुपयांची बिले उत्पन्न मिळूनही थकीत का ठेवण्यात आली? कर्मचाऱ्यांचा किती महिन्यांचा पगार थकीत आहे,आणि ती रक्कम किती आहे,याची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यात यावी,कारखान्याचे कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावर व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार यांनी गुन्हे दाखल केले असून ते काढून घेण्याबाबत ठराव करण्यात यावा.तोट्याचा बोजा चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या जमिनीवर चढविण्यात यावा असा ठराव करण्यात यावा आणि त्याची प्रत मिळावी.२०१९-२०या वर्षात भंगार विक्री केली असून यात भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय आहे याबाबत सविस्तर चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्या श्री अभिजीत पाटील यांनी केल्या आहेत, एक सभासद म्हणून ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी सभेची लिंक व पासवर्ड मिळावा अशी मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button