Amalner

अमळनेर: अभाविप तर्फे प्रताप महाविद्यालयात संविधान दिवस साजरा…

अभाविप तर्फे प्रताप महाविद्यालयात संविधान दिवस साजरा…

अमळनेर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्रताप महाविद्यालयात दि २६ नोव्हेंबर ला संविधान दिवस साजरा करण्यात आला.सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विदयार्थ्यांना ऑनलाईन संविधान प्रश्नमंजुषा देण्यात आली.

संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले.तसेच मुंबई वर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले वीर जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.पी.आर.शिरोडे सर, अभाविपचे शहरमंत्री केशव पाटील,महाविद्यालय प्रमुख अमोल पाटील,अक्षद शहा,पवन पाटील,अश्विन पाटील, वैभव पाटिल, हर्षवर्धन बडगुजर,चैत्राली बाविस्कर,कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button