Pandharpur

पंढरपूर येथे अ भा वि प चे आंदोलन.

पंढरपूर येथे अ भा वि प चे आंदोलन.

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर तामीळनाडूतील तंजावर येथे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या त्रासामुळे लावण्या या विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागली. परंतु अद्यापही तेथील DMK सरकारने त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.लावण्याला न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री सुश्री निधी त्रिपाठी या चेन्नई येथे शांततापूर्वक आंदोलन करत होत्या,परंतु तेथील DMK सरकारने त्यांना अटक केलेली आहे. DMK सरकारच्या या कृत्याचा अभाविप पंढरपूर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला, या निदर्शनात बोलताना अभाविप पश्चिम महाराष्ट्र सहमंत्री आनंद भुसनर यांनी म्हटले की शाळा महाविद्यालयात ख्रिश्चन मिशनऱ्यांनकडून होणारे हे सक्तीचे धर्मातरण हे देशाच्या एकात्मतेला हानिकारक आहे आणि पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अभाविप राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांची सुटका करण्यात यावी अशी मागणी केली आणि या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या Dmk सरकारला इशारा देताना सांगितले की यावर लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा यापुढे तिव्र आंदोलन करण्यात येईल, यावेळी अभाविप शहरमंत्री कपिल पाटील, सहमंत्री सुरज भोसले, दिग्विजय देशमुख, अदिती उत्पात, रोहिणी शिंदे, शिवानी बेणारे, रेणुका बडवे, प्रणव बाडगंडी, प्रथमेश वागिरे, धनराज भोसले, आर्यन नराळे, श्रीकांत जाधव, प्रशांत मथकंटे, श्रीपाद आराध्ये आदीसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button