Amalner

बस स्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण..!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बस स्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण..!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमळनेर येथील बस स्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात आजी पुष्पबाई दत्तू पाटील रा मारवड त अमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पाबाई यांची अल्पवयीन नात सह मारवड येथे राहतात. मुलगा व पती मयत असून
मुलगी सुनीता हिस बघण्यासाठी जात असताना अमळनेर बस स्थानकात सकाळी साडे नऊ वाजता नाती सह पोहचल्या.दरम्यान नात लघु शंकेच्या निमित्ताने गेली. त्या नंतर बराच वेळ ती परत आली नाही म्हणून तिचा शोध घेण्यास केली असता ती मिळून आली नाही. तिचा मोबाईल नं लावला असता बंद आला.त्याच वेळी लोकांकडून कळले की MH18 BP9307 ह्या मोटरसायकल वर इसम व एक मुलगी असे मोटरसायकल ने निघून गेले. त्यानंतर त्यांनी त्यांचे जवयाना बोलवून घेतले.जावयाने मोटरसायकल ओळखून गावातील सुनील ताराचंद भवरे व गणेश ठाकरे यांचा भाचा गोपीचंद बारकू पवार रा डाबली ता शिंदखेडा यांच्या कडे असून तो अनेक वेळा गावात दिसून आला होता.याआधी देखील त्याने मुलीला घेऊन जाण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो नातीला पळवून घेऊन गेला आहे.या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात कलम 363 नुसार गोपीचंद पवार वर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास दीपक पाटील हे करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button