Amalner

नगरपालिकेकडे थकीत असलेल्या शिक्षण मंडळच्या अनुदानाबाबत 2 ऑक्टोबर गांधी जयंतीस उपोषणाचा इशारा…

नगरपालिकेकडे थकीत असलेल्या शिक्षण मंडळच्या अनुदानाबाबत 2 ऑक्टोबर गांधी जयंतीस उपोषणाचा इशारा…

अमळनेर महाराष्ट्र शासागर विकास विभाग, शासा निर्णय १०९०/ १२६१/सीआर ३७२/८०/वि/०१ दिाकं १०-०४-१९९३ नुसार नगरपालिकेने शिक्षण मंडळास दरमहा १० टक्के अनुदान देणे क्रमप्राप्त आहे..
तसेच मा. आयुक्त तथा संचालक साहेब यांचे (दरमहिन्याला अनुदान मंजुरीचे आदेश)
आदेश क्र.नपप्रसं/२०२१/नपा सहा.अनुदान/प्र.क्र.३/का-५ दि.५ जुलै २०२१ च्या आदेशातील विशेष सुचना क्र.०५ चे निर्देशानुसार शिक्षण मंडळास अनुदान देणेबाबत स्पष्टपणे नमुद असतांनाही नगरपालिकेकडून शिक्षण मंडळास १० टक्के मिळत नसल्याने शिक्षण मंडळाती कर्मचाऱ्याचे पगार व पेन्शनर शिक्षकांचे पेन्शन वेळेवर होत नाही. बरेच पेन्शनर शिक्षक हे अतिदुर्धर आजाराने पिडीत आहेत. तर काही पेन्शनरशिक्षकांना पेन्शन व्यतिरिक्त कुठलेही उत्पन्नाचे स्त्रोत नसल्यामुळे
त्यांना त्यांचे जिवन जगणे असाह्य झालेले आहे. तसेच जे पेन्शनर शिक्षकांचे निधन झालेले आहे.
अशा पेन्शनर शिक्षकांच्या विधवा स्त्रियांना कुटूंबानंतरचे पेन्शन वेळेवर मिळत नसल्याने त्यांना खुपच अडचणी निर्माण होतात. म्हणून आपणास विनंती की, शिक्षण मंडळाचे अमळनेर नगरपालिकेकडे थकीत असलेले अनुदान रक्कम रु.४९८२९५८/- (अक्षरी रुपये- एकोणपन्नास लाख ब्यांयशी हजार नऊशे अठ्ठावन्न मात्र) देणेची आपले स्तरावरुन तजवीज करावी अशी विनंती.

वरील विषयाच्या अनुषंगाने तसेच विषयाचे गांभिर्य पाहून आपण आपल्यास्तरावरुन
तात्काळ शिक्षक हिताचे आदेश देणार अशी मी अपेक्षा करतो. परंतू तसे न झाल्यास मला दुर्धर आजाराने झंजत असलेल्या सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिकासाठी ०२ आक्टोंबर २०२१ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन तहसिल कार्यालयासमोर सकाळी १०-०० वाजेपासून अमरण उपोषणास सर्व पेन्शनर शिक्षकासह बसण्यांत येईल. उपोषणाच्या काळांत पेन्शरांचे जिवितीस काही
धोका झाल्यास त्यास मुख्याधिकारी साहेब, व लोकनियुक्त अध्यक्षा साहेब हया जबाबदार राहातील याची नोंद घ्यावी असा इशारा पत्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button