Aurangabad

रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेला दोन फूट खोल खड्डा ठरतोय प्रवासी वर्गाला जीवघेणा

रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेला दोन फूट खोल खड्डा ठरतोय प्रवासी वर्गाला जीवघेणा

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात रस्त्यावर अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत. रेल्वे उड्डाणपुलाजवळ रोडवर पडलेला दोन फूट खोल खड्डा हा प्रवासी वर्गाला जीवघेणा ठरतो आहे. संबंधित विभाग खड्डा बुजविण्याचे काम करत नसल्याने आणी कामात तत्परता दाखवीत नसल्याने या खड्ड्यांमुळे भविष्यात भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज औरंगाबादवरून कोपरगाव कडे जाणाऱ्या गृहस्थाची मोटरसायकल खड्ड्यातून गेल्याने मोटरसायकल स्वाराचा किरकोळ अपघात झाला. तसेच सुदैवाने मागून वाहन येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तात्काळ संबंधित विभागाने दोन फूट खोल पडलेला खड्डा बुजवावा अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button