Delhi

दिल्ली च्या जंतर मंतर वर 2 ऑकटोबर ला होणार पुरुष आयोग त्वरित गठीत करण्यासाठी जोरदार प्रदर्शन.

दिल्ली च्या जंतर मंतर वर 2 ऑकटोबर ला होणार पुरुष आयोग त्वरित गठीत करण्यासाठी जोरदार प्रदर्शन.

दिल्ली : काही स्त्रियांकडुन होणारा कायद्याचा गैरवापर तसेच भा.दं.वि कलम-498 ए, डोमेस्टिक व्हायलन्स अँक्ट, कलम-125 CRPC तसेच अन्य वैवाहिक कायद्यांचा होणारा दुरूपयोग ठाम्बविण्यासाठी, विवाहसंस्था वाचविणे आणि विवाहव्यवस्था टिकवणे, पुरुषांच्या वाढत्या आत्महत्या ठाम्बविणे तसेच कुटुंबातील वयोवृद्ध व लहान मुलांची फरफट ठाम्बवण्या साठी राष्ट्रीय पुरूष आयोग आणि पुरूष मंत्रालयाय त्वरित स्थापन व्हावा याकरिता पुरूष हक्क संरक्षण समितीचे अँड संतोष शिंदे गेली 24 -25 वर्षे कार्यरत आहेत. पुरुष आयोग त्वरित स्थापित व्हावा करिता मा. पंतप्रधान, कायदा मंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच अन्य मंत्री व सरकारी अधिकारी यांस वेळोवेळी लेखी निवेदने दिली आहेत. मात्र त्याला थोडक्यात प्रतिसाद दिला असून पुरुष आयोगाच्या गठनासाठी ठोस पाऊले आजतागायत उचलण्यात का आली नाहीत. यासाठी ऍड संतोष शिंदे 2 ऑकटोबर ला सरकारच्या ढिसाळपणा विरुद्ध जोरदार आवाज उठवणार आहे. पुरूष आयोगाच्या मागणीसाठी श्री. संतोष शिंदे, श्री कपिल सक्सेना, श्री.अक्षय धवन, श्री अशोक दशोरा, डॉ इंदू सुभाष, बरखा त्रेहान, दर्शन यादव आदी परिश्रम घेत आहेत. ऍड संतोष शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून पुरुष आयोग तसेच पुरुष मंत्रालयाची स्थापना त्वरित व्हावी याकरिता प्रयत्न करीत असून त्याकरिता भारताच्या संसदेत याबाबत प्रश्न मांडून आवाज उठविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याकामी राज्यसभेच्या सेक्रेटरीएट तर्फे मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स कडे ऍड शिंदे यांची नियुक्ती होणे कामी प्रस्ताव पाठविला असून संपूर्ण भारतातील संस्थानी तसेच पीडित बंधू-भगिनींनी ऍड शिंदे यांची त्वरित नियुक्ती होणेबाबत आवाज बुलंद करावा असे आवाहन ऍड. शिंदे यांनी केले असून याकरिता मोबा नं- 7507004606 वर सम्पर्क साधण्याचे आवाहन अँड संतोष शिंदे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button