Amalner

ठोस प्रहारचा दणका..!आरोग्य विभागला आली जाग.. ग्रामीण रुग्णालय झाले चकाचक…! झाली स्वच्छता..युवा अविनाश ची मेहनत रंग लायी…

ठोस प्रहारचा दणका..!आरोग्य विभागला आली जाग.. ग्रामीण रुग्णालय झाले चकाचक…! झाली स्वच्छता..

अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अस्वच्छते बद्दल युवा अविनाश पाटील ने ग्रामीण रुग्णालयात जाऊन काही फोटो ग्राफ्स आणि त्या संदर्भातील नाराजी व्यक्त केली होती. ह्या विषयाची माहिती अविनाश ने ठोस प्रहार कडे देखील अत्यन्त विश्वासाने पाठविली होती.त्या अनुसरून ठोस प्रहारने ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छता, फाटलेल्या गाद्या, ठिक ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले मेडिकल साहित्य,हाथ मोजे,सलाईन च्या बाटल्या इ ची बातमी ग्रामीण रुग्णालय अस्वच्छतेचे आगार अंधेर नगरी चौपट राजा ह्या मथळ्याखाली प्रकाशित केली होती. यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ ताळे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून याबाबत माहिती देऊन अस्वच्छता असण्या मागील कारण विचारले होते. त्यावर स्टाफ कमी असून स्वच्छतेचा काँट्रॅक्ट संपला आहे व लवकरच साफ सफाई केली जाईल असे डॉ ताळे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे आज डॉ ताळे यांनी ठोस प्रहरच्या वृत्ताची दखल घेत संपूर्ण ग्रामीण रुग्णालयात साफ सफाई स्वच्छता करून त्या संदर्भाची माहिती ठोस प्रहारला दिली.तसेच श्रीमती वळवी सिस्टर कक्षसेवक,सुदाम पवार
अमन बेंडवाल,निर्मला चव्हाण,निलेश भुरट इ कर्मचाऱ्यांनी साफ सफाई कार्यात हाथ भार लावला आहे.

युवा वर्गाला हीच विनंती आहे की आपण आपल्या आजूबाजू होत असलेल्या चुकीच्या गोष्टी थांबवू शकतात. एका अविनाश ने हिंमत आणि सुजाण नागरिक असल्याचे दर्शवत एक आवाज उठविला तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम देखील दिसून आला.चला तर मग सर्वांनी आवाज उठवू या..अविनाश बनू या…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button