Jalgaon

सोनबर्डी आश्रम शाळेत सामाजिक मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्यात आदिवासी बांधवांना जातीचे दाखले आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात कार्यक्रम घेण्यात आला

सोनबर्डी आश्रम शाळेत सामाजिक मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्यात आदिवासी बांधवांना जातीचे दाखले आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात कार्यक्रम घेण्यात आला

जळगांव : आज दिनांक आठ रोजी सोनबर्डी आश्रम शाळेत आजूबाजूच्या 15 खेड्यातील सामाजिक मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्यात आदिवासी बांधवांना जातीचे दाखले आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात कार्यक्रम घेण्यात आला तरी कार्यक्रमाला उपस्थित माननीय आमदार आबासो चिमणराव पाटील तसेच माननीय प्रांताधिकारी गोसावी साहेब तसेच तालुक्याचे तहसीलदार चव्हाण मॅडम तसेच जिल्हा परिषद सदस्य माननीय मंगल सिंग गायकवाड तसेच महानंदा ताई व आदिवासी टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष एरंडोल तालुका अध्यक्ष असे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते त्याचप्रमाणे कार्यक्रमात आदिवासी भिल्ल समाजाला एकूण सातशे रेशन कार्ड वाटप करण्यात आले त्यात आदिवासी भिल्ल बांधवांना तीनशे जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते, आदिवासी आदिवासी टायगर सेनेचे राज्य प्रवक्ता पंढरीनाथ मोरे यांनी समाजाला मार्गदर्शन करताना आमदार साहेबांना समाजाच्या विविध समस्यांचसमस्यांची जाणीव करून देताना आमदार साहेबांना हे लक्षात आणून दिलं की आदिवासी समाजाला काय काय समस्या आहेत आणि तुमच्या कडून काय काय अपेक्षा आहेत तरी या कार्यक्रमात आमदार साहेबांनी आदिवासी समाजाला शब्द दिला की अर्ध्या रात्री तुम्ही हाक मारा मी तुमच्या समस्या सोडविण्यास हजर राहीन येणाऱ्या काळात कुठल्याही समस्या असल्या तरी भिल बांधवांनी माझ्याशी डायरेक्ट संपर्क करावा मी त्या समस्या सोडवण्यास तत्पर असेन, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाध्यक्ष भूषण घेतील तसेच जिल्हा कार्याध्यक्ष राज्याची मालचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मोरे तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे पारोळा तालुका अध्यक्ष रवी माळी तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button