Chandwad

आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या नेतृत्वाखाली आज चांदवड मुंबई-आग्रा महामार्गावर विविध मागणीसाठी ठिय्या आंदोलन

आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या नेतृत्वाखाली आज चांदवड मुंबई-आग्रा महामार्गावर विविध मागणीसाठी ठिय्या आंदोलन

उदय वायकोळे चांदवड

आज चांदवड पेट्रोलपम्प चौफुली मुंबई आग्रा महार्गावर चांदवड देवळ्याचे आमदार डॉ राहुलदादा आहेर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले,यावेळी आंदोलनात मांडलेले प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे,
१.विज वितरण कंपनीकडून सक्तीची वीज वसुली व पूर्वसूचना न देता रोहित्र बंद करण्याचे काम थांबले पाहिजे
२.शेतकऱ्यांना २४ तासाच्या आत रोहित्र मिळाले पाहिजे.
३.दिवसा १२ तास विज मिळाली पाहिजे.
४.ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात गुलाब चक्रीवादळात चांदवड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील शासकीय यंत्रणाकडून देण्यात आलेल्या चुकीच्या आकडेवारीमुळे मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे.
५.महाराष्ट्र राज्य रस्ते प्राधिकरण यांच्या कडून सुरू असलेल्या एन.एच ७५२ जी या रस्त्याच्या कामात चांदवड शहरात चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामाची व्यवस्थित रित्या आखणी करून स्थानिक नागरिक व प्रशासनाला विश्वासात घेऊन काम केले पाहिजे.
ह्या प्रमुख मागणी साठी सुमारे ३ तास आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या नेतृत्वाखाली तालुका भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील जि प गटनेते डॉआत्माराम कुंभार्डे,प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल,भाजप तालुकाध्यक्ष श्री मनोज शिंदे, शांताराम भवर, बाळासाहेब माळी, प्रशांत ठाकरे, एन झेड जैन सर, निकम सर, गणेश महाले, बाळासाहेब वाघ, मोहन शर्मा, अशोक भोसले, अशोक व्यवहारे, अण्णा शिंदे, विजय धाकराव, योगेश ढोमसे, योगेश साळुंखे, नाना सलादे, वाल्मिक पवार, अण्णा शिंदे ,महेश खंदारे,भाजपा चांदवड तालुक्यातील जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button