Aurangabad

आ. संजय शिरसाट यांनी विविध कामांची केली पाहणी

आ. संजय शिरसाट यांनी विविध कामांची केली पाहणी

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : आ. संजय शिरसाट यांच्या विशेष प्रयत्नातून पश्चिम मतदार संघामध्ये 25 कोटी व 15 कोटींची कामे राज्य शासनाकडून रस्ते, ड्रेनेज लाईनच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आता सातारा-देवळाईकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला आहे. औरंगाबाद शहरासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. आता औरंगाबाद शहरासाठी प्रस्तावित पाणी योजना मंजूर झाल्यामुळे शहरवासियांना पाण्याचा कायमचा प्रश्न मिटला आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतलेल्या 15 कोटींची रस्त्याची कामे सुरू करण्याआधी त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत सुधाकरनगर, अहिल्याबाई होळकर चौक, संभाजी चौक, म्हाडा कॉलनी, आयप्पा मंदिर, अरुणोदय कॉलनी, अलोकनगर या सातारा-देवळाई परिसरात रस्ते, पाण्याची पाईप लाईन व टाकीची पाहणी केली आहे.

सातारा-देवळाई हा परिसर प्रामुख्याने मोठ्या लोक संख्येने वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी कुठलेही पाण्याची पाईप लाईन नसल्यामुळे या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे या भागात संपूर्ण नवीन पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना करावी लागणारी भटकंती होणार नाही, असे आमदार शिरसाट म्हणाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button