Surgana

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे कोरोना सध्यास्थिती , लसीकरण व त्यावरील उपाययोजना याबाबत पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न…

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे कोरोना सध्यास्थिती , लसीकरण व त्यावरील उपाययोजना याबाबत पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न..
विजय कानडे सुरगाणा
सुरगाणा : सदर बैठकीत कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन अर्जुन (ए.टी.) पवार यांनी सुरगाणा व कळवण तालुक्यातील कोवीड सेंटरमध्ये सुरळीत ॲाक्सीजन सिलिंडर पुरवठा करुन मुबलक सिलिंडर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच, कोरोना चाचण्या, संक्रमित रुग्ण, ॲाक्सीजन पुरवठा व औषधोपचार यावर पालकमंत्री यांचे लक्ष वेधले.
विशेषत: सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना विषाणू बाबत जनजागृती करुन त्यांचे वेळेत निदान करुन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. आमदार पवार साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने प्रस्तावित असलेल्या सुरगाणा , बा-हे व कळवण तालुक्यातील अभोणा येथे तात्काळ ॲाक्सीजन जनरेशन प्लांट कार्यान्वित करण्याची तसेच उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे ५० बेडचे कोवीड सेंटर येत्या २ दिवसांत कार्यान्वित करण्यात यावे अशी आग्रही भूमिका मांडली.
आदिवासी बहुल ग्रामीण भागातील सुरगाणा व कळवण तालुक्यातील नागरीकांच्या आरोग्यासाठी तात्काळ कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली.
यावेळी कृषी मंत्री ना.दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ साहेब, खासदार हेमंत गोडसे, जि.प.अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, महापौर , जिल्हाधिकारी नाशिक, पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब, मनपा आयुक्त जाधव साहेब, नाशिक पोलीस आयुक्त पांडेय साहेब, लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार महोदय उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button