Dhule

शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे नंदुरबार येथील त्या नगरसेवकाचा पुतळा जाळून रास्ता रोको करत निषेध करण्यात आला.

शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे नंदुरबार येथील त्या नगरसेवकाचा पुतळा जाळून रास्ता रोको करत निषेध करण्यात आला.

राहुल साळुंके धुळे

धुळे : काल दिनांक ५जून रोजी नंदुरबार येथे आदिवासी महिला ताईसो.निशा पावरा शासकिय कर्मचारी आपले कर्त्तव्य बजावत असताना नंदुरबार येथील नगरसेवक गौरव चौधरी ह्याने अमानुषपणे मारहाण करत जातीवाचक शिविगाळ केली आहे ह्या निर्दयी इसमाचा जाहीर निषेध म्हणून आज सांगवी पोलीस स्टेशन येथे कठोर गुन्हे दाखल करण्यासाठी निषेध निवेदन देण्यात आले तसेच शिरपूर तालुक्यातील आक्रमक झालेल्या अनेक आदिवासी संघटनांनी नॅशनल हायवे रोकत रास्ता रोको करून सदर इसमाचां पुतळा जाळण्यात आला.
ह्या वाळू माफिया नगरसेवकावर लवकरात लवकर ( IPC ऍक्ट ) section अ जा क 3 (11) 353,354, 323,504,506,(2) 34 ) अंतर्गत तसेच अट्रोसिटी एक्ट अंतर्गत जेरबंद करून कारवाई करावी व ह्याचे पद तात्काळ रद्द करावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करेल असे निवेदन तसेच शिरपूर तालुक्यातील आदिवासी समाज रस्तावर उतरून निषेध आंदोलन करेल, राजकीय दबावाखाली सदर गुन्हा दाखल केला नाही तर, राज्यातील सर्व आदिवासी समाजाच्या विविध संघटना कडून तीव्र निषेध मोर्चा काढ़ण्यात येईल, कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील, अश्या प्रकारचे निषेध निवेदन सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.वारे साहेब ह्यांना देण्यात आले व साहेबांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

ह्यावेळी जयस महाराष्ट्र शिरपूर, बिरसा ब्रिगेड, आदिवासी टायगर सेना, आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शिरपूर आदि संघटनेचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी तसेच अनेक आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button