Nandurbar

एम. आई. एम. नंदुरबार च्या वतीने फ्राँस च्या राष्ट्रपती इम्यानूएल मक्रॉन चे फ़ोटो जाळण्यात आले …

एम. आई. एम. नंदुरबार च्या वतीने फ्राँस च्या राष्ट्रपती इम्यानूएल मक्रॉन चे फ़ोटो जाळण्यात आले …

फहिम शेख

आज 30 अक्तूबर 2020 शुक्रवार दुपारी 04:00 वा. च्या सुमारास एम. आई. एम. नंदुरबार च्या वतीने फ्राँस च्या राष्ट्रपती इम्यानूएल मक्रॉन चे फ़ोटो जाळण्यात आले …

फ्राँस च्या राष्ट्रपती इम्यानूएल मक्रॉन ने इस्लाम विरुद्ध टिप्पणी केल्याने जगभरात त्याच्या विरुद्ध प्रदर्शने सुरू झाली आहे, लोक रस्त्यावर उतरले असुन फ्रेंच राष्ट्रपतींचा पुतळा दहन, फोटो दहन आदी प्रदर्शने सुरू झाली आहे जी वाळत चालली आहे, अनेक देश फ्रेंच प्रॉडक्ट चा बॉयकॉट करत असुन दिवसांदिवस आर्थिक फटका बसत असल्याचे शेयर बाजारात दिसुन येत आहे.

नंदुरबार एम आई एम च्या वतीने ही इलाही चौक येथे मक्रॉनचे फ़ोटो दहन करण्यात आले …

कोविड 19 च्या पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टेन्सचे पालन करुन तोंडावर मास्क लावुन गर्दी ना करता फक्त पदाधिकाऱ्यांनी फ़ोटोचे दहन केले, या प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन, युवा जिल्हाध्यक्ष शोएब खाटिक, युवा कार्याध्यक्ष मुजम्मील हुसैन, तालुका अध्यक्ष आरिफ सैय्यद आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, अभिव्यक्ती स्वतंत्रता च्या नावाखाली एका धर्म विशेष वर आघात करुन धार्मिक भावना दुखावने हा कुठला नियम करण्यात आला आहे ?
अश्या प्रकारची दुटप्पी भूमिका घेणारे कोणीही असो आम्ही कधीही सहन करणार नाही …
एम आई एम प्रत्येक वेळी अश्यांना उत्तर देण्यास तैय्यार आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button