Khirdi

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वडगांव गावांजवळ विवरे येथील मोटरसायकल स्वार जागीच ठार तर एक जखमी

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वडगांव गावांजवळ विवरे येथील मोटरसायकल स्वार जागीच ठार तर एक जखमी

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : अंकलेश्वर – बुरहानपुर महामार्गावर सावदा – रावेर रोड वडगांव फाटा ते सुकीनदी पुला दरम्यान सावदा येथुन विवरे येथे घरी येतांना हिरो स्पेलेंडर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जखमी झाल्याची घटना आज दुपारी एक दिड वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मोटरसायकल स्वार विवरे येथील राहणारा असुन मिटर रिडींगचे काम करीत होता. त्याचे नाव अनिल महिपत वाघोदे अंदाजे वय ४५ , अनिल वाघोदे आपले खाजगी काम करुन घरी विवरे येथे जात असतांना सोबत गाडीवर एक असे दोन जण सावदा कडुन मोटरसायकलने ‘ MH19 – BZ 9867 ‘ वडगांव गावाजवळ सुकीनदी पुला दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने अनिल महिपत वाघोदे यांचा जागीच मुत्यु झाला. तर दुसरा राहुल भरत गाढे भयंकर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये भाग. ५ गु.र.नं.१०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. स्वप्नील उणवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.मयत अनिल वाघोदे यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचा पश्चात आई वडील दोन मुली एक मुलगा भाऊ बहीण असा परिवार आहे.ही घटना विवरे गावांत समजताच एकच खळबळ उडाली.शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित लेख

Back to top button