Motha Waghoda

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठा वाघोद्यात वृक्षारोपण त्रिमूर्ती फाऊंडेशन व मोठा वाघोदा ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम नैसर्गिक ऑक्सिजन काळाची गरज

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठा वाघोद्यात वृक्षारोपण त्रिमूर्ती फाऊंडेशन व मोठा वाघोदा ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम नैसर्गिक ऑक्सिजन काळाची गरज

मुबारक तडवी मोठा वाघोदा

मोठा वाघोदा : आज दि ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आणि कोरोना महामारी संकटात सर्वानाच कळालेली ऑक्सिजन ची किंमत लक्षात घेता आजच्या आनंदमयी दिनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करीत वीर आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली
यानिमित्ताने मोठा वाघोदा ग्रामपंचायत सरपंच मुबारक तडवी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते सर्व प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच मुबारक (राजू) अलिखा तडवी उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी,माजी सरपंच विद्यमान सदस्य कालू मिस्तरी,संजय माळी, स्वप्निल पवार, हर्षल पाटील, तलाठी , वानखेडे, डॉ.राणे, सुनिल पाटील, पंकज मालखेडे यांचे हस्ते करण्यात आले
तसेच मुस्लिम समाज कब्रस्तानात जळगांव चे जेष्ठ विधीज्ञ ॲड याकुब तडवी साहेब, विक्री कर आयुक्त नासेर अकबर खा तडवी,कालु मिस्तरी, भिकारी तडवी,उत्तम वाघ,असलम सलीम तडवी, संजीव रमजान तडवी, तस्लिम तडवी,समीर तडवी,बबलू तडवी, भैय्या महाजन,शरीफ तडवी आदिंनी कब्रस्तानात फुलझाडे फळझाडे लावून आदिवासी दिवस साजरा केला तसेच तडवी वाडा अलफतेह नगर निंभोरा रोड या भागातील तडवी भिल्ल समाजाच्या कार्यकर्त्यांना तर्फे आदिवासी दिनाचे संस्कृती जतन व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा व खाज्या नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य चालू मिस्त्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आहेत या समय मोठे वाघोदा येथील माजी सरपंच राजेंद्र सावळे तसेच सदस्य हशिर तडवी बबलू तडवी ,न्याजोद्दीनं तडवी,मुक्तार हबीब अजीत निजाम हसिर चांदखा आदि सह नवयुवक महिला वर्ग सहभागी होते

संबंधित लेख

Back to top button