Bollywood

सौरव गांगुलीच्या जीवनावर लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार..!पहा कोण आहे अभिनेता..!

सौरव गांगुलीच्या जीवनावर लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार..!पहा कोण आहे अभिनेता….!

मुंबई भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रटामध्ये सौरव गांगुली यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यासाठी दोन अभिनेत्यांची नावे देखील घेतली जात आहेत.
एका मुलाखतीमध्ये सौरव गांगुली यांनी स्वत: बायोपिक विषयी माहिती दिली. निर्माते चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करत असून लवकरच चित्रपटात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार हे ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच त्यांनी अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता असल्याचे सांगितले. पण चित्रपटाचे निर्माते किंवा दिग्दर्शकांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
सौरव गांगुली यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर बायोपिकमध्ये रणबीर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या. तर काहींनी स्वतः सौरव ने ही भुमीका सकारावी असे मत व्यक्त केले आहे.
लव्ह फिल्म्स आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्वीट करून बायोपिकची घोषणा केली होती. गांगुली यांनी या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “क्रिकेट हे माझे आयुष्य आहे. क्रिकेटमुळे मला ताठ मान ठेवून पुढे चालण्याचा आत्मविश्वास आणि क्षमता मिळाली आहे. लव फिल्म्स माझ्या आयुष्यातील प्रवासावर एक बायोपिक तयार करून ते मोठ्या पडद्यावर दाखवतील, याचा मला आनंद आहे.”

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button